शिक्षक-शिक्षकेतर पतपेढीची निवडणूक 15 जूननंतर घ्यावी

शिक्षक-शिक्षकेतर पतपेढीची निवडणूक 15 जूननंतर घ्यावी

97738
संजय वेतुरेकर

शिक्षक-शिक्षकेतर पतपेढीची
निवडणूक १५ जूननंतर घ्या

संजय वेतुरेकर; अधिकाऱ्यांना निवेदन

तळेरे, ता. २१ : सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. सिंधुदुर्गनगरी पतपेढीची निवडणूक १५ जूननंतर घ्यावी, अशी मागणी शिक्षक भारतीच्यावतीने जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. सिंधुदुर्गनगरी पतपेढीची अंतिम मतदार यादी २०-२१ एप्रिलला प्रसिद्ध होणार असल्याचे समजते. साहजीकच पतपेढी व प्रत्यक्ष निवडणूक शाळेच्या दीर्घ मुदतीच्या रजा कालावधीमध्ये होण्याची शक्यता वाटते. शाळांना ३ मे ते ५ जूनपर्यंत उन्हाळी सुटी आहे. या कालावधीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आपल्या मूळ गावी जातात. त्यामुळे या निवडणुकीपासून व मतदानाच्या हक्कापासून बरेचसे सभासद वंचित राहू शकतात. आमचे अधिकतर सभासद बाहेरील जिल्ह्यातील असल्याने त्यांचे आपल्या जिल्ह्यात जाण्यासाठीचे पूर्वनियोजन झालेले असते. उन्हाळी सुटीत स्थानिक सभासदांचेही बाहेरगावी जाण्याबाबत नियोजन झालेले असते. त्यामुळे या सर्व गोष्टींचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता असून सभासद आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींचा विचार करून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्थेची प्रत्यक्ष निवडणूक १५ जूननंतर सुटीच्या दिवशी घ्यावी, अशी मागणी शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष तथा राज्यप्रमुख कार्यवाह वेतुरेकर यांनी सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सिंधुदुर्ग यांच्याकडे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com