हुमरमळा येथे आरोग्य चिकित्सा

हुमरमळा येथे आरोग्य चिकित्सा

97742
हुमरमळा ः डॉ. प्रशांत जाधव यांना सन्मानपत्र बहाल करताना नूतन परब, प्रा. पांढरे आदी.

हुमरमळा येथे आरोग्य चिकित्सा
कुडाळ ः राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत (एनएसएस) हुमरमळा येथील श्री पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी व सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने कॉलेजच्या सभागृहात मोफत आरोग्य शिबिर पार पडले. संस्थेच्या कॅम्पस डायरेक्टर नूतन परब व प्रा. युवराज पांढरे यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. शिबिरात रक्त चाचणीसाठी एकूण ३०० विद्यार्थी, कॉलेज कर्मचारी व ग्रामस्थांचे रक्त नमुने घेण्यात आले. सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जाधव, प्रयोगशाळा समन्वयक शुभम परब, रक्त तपासक कांचन परब, आशिष परब, साहिल गावडे यांचे शिबिरासाठी मोलाचे सहकार्य लाभले. संस्थाध्यक्ष भुपतसेन सावंत यांचा पुढाकार व मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या शिबिराच्या समारोपावेळी कॉलेजच्यावतीने नूतन परब यांच्या हस्ते डॉ. जाधव व त्यांच्या टीमचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी फार्मसी, नर्सिंग व ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी, सर्व फॅकल्टीचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
................
‘डॉट कॉम्स’तर्फे ऑनलाईन परीक्षा
कुडाळ ः डॉट कॉम्स असोसिएशन संस्थेमार्फत ३० एप्रिलला सामान्य ज्ञानावर आधारीत ऑनलाईन परीक्षा पहिली ते आठवीसाठी चार गटात (पहिली व दुसरी एक गट याप्रमाणे) व खुल्या गटासाठी २५ प्रश्न १०० गुणांची घेतली जाणार आहे. किमान ८० टक्के प्रश्न संस्थेच्या ‘ज्ञानी मी होणार’, या पुस्तिकेवर आधारीत असणार आहे. प्रथम तीन क्रमांकांना धनादेश, रोख बक्षीस, टॉफी व ई-प्रमाणपत्र दिले जाणार आहे. जास्त स्पर्धक सहभागी झाल्यास १० टक्के गुणवत्ता यादी काढली जाईल. समान गुण पडल्यास प्रथम फी भरून नोंदणी करणाऱ्या स्पर्धकाला प्राधान्य दिले जाईल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी संजय बगळे याच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com