कबड्डीत जिल्ह्याचा नावलौकिक व्हावा

कबड्डीत जिल्ह्याचा नावलौकिक व्हावा

97743
पिंगुळी ः येथे आयोजित निमंत्रित साखळी कबड्डी स्पर्धेचे उद्‍घाटन करताना भगवान रणसिंग. शेजारी गणपत मसके, परशुराम गंगावणे, ना. बा. रणसिंग, अजय आकेरकर, भास्कर गंगावणे आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)

कबड्डीत जिल्ह्याचा नावलौकिक व्हावा

भगवान रणसिंग; पिंगुळीत कबड्डी स्पर्धेचे उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २२ ः कोकणच्या लाल मातीतील कबड्डीमध्ये ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात खेळाडू तयार होत आहेत. त्यांनी जिल्ह्यासह राज्य, राष्ट्रीय पातळीवर या क्रीडा प्रकारात यश मिळवून जिल्ह्याचा नावलौकिक करावा, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग ठाकर समाज जिल्हाध्यक्ष व मित्रमंडळाचे अध्यक्ष भगवान रणसिंग यांनी कबड्डी स्पर्धेच्या उद्‍घाटन प्रसंगी काल (ता. २२) केले.
पिंगुळी-गुढीपूर (ता.कुडाळ) येथील श्री भगवान रणसिंग मित्रमंडळातर्फे कुडाळ तालुका कबड्डी असोसिएशन आणि सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने जिल्हास्तरीय निमंत्रित खुला पुरुष गट कबड्डी साखळी सामन्याचे आयोजन श्री देवी भद्रकाली मंदिर नजीकच्या प्रांगणात करण्यात आले. श्री देवी भद्रकालीला श्रीफळ ठेवून स्पर्धेचे उद्‍घाटन रणसिंग यांच्या हस्ते झाले. यावेळी शासनाचा आदिवासी गिरीजन पुरस्कार प्राप्त लोककलाकार गणपत मसके, पद्मश्री परशुराम गंगावणे, ज्येष्ठ साहित्यिक ना. बा. रणसिंग, ठाकर ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी भास्कर गंगावणे, सरपंच अजय आकेरकर, उपसरपंच सागर रणसिंग, प्रकाश पांगुळ, सुरेश रणसिंग, सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनचे तुषार साळगावकर, विकास ठाकूर, सुधीर गंगावणे, मनोहर ठुंबरे, स्पर्धा निरीक्षक राजेश सिंगनाथ, पंचप्रमुख सागर पांगुळ, पांडुरंग आटक, बाळकृष्ण रणसिंग, शशांक आटक, सुरेश गंगावणे, सुभाष रणसिंग, रणजित रणसिंग, विठ्ठल सिंगनाथ, राजन सिंगनाथ, भरत ठाकूर, दिलीप मसके, अनुज रणसिंग, कार्तिक रणसिंग, नयन रणसिंग, मंथन रणसिंग, प्रल्हाद रणसिंग, राजाराम पांगुळ, विघ्नेश चव्हाण, पंच प्रीतम वालावलकर, वैभव कोंडसकर, कृष्णा सावंत, दाजी रेडकर, सी. ए. नाईक, जयेश परब, हेमंत गावडे, अमित गंगावणे, अमोल मराठे आदी उपस्थित होते.
पद्मश्री गंगावणे यांनी पिंगुळी ही कला, क्रीडांची भूमी आहे. या भूमीतून अनेक कलाकारांनी आपले नाव जागतिक पातळीवर नेले आहे, असे सांगितले. तर गणपत मसके यांनी कबड्डी हा खेळ आक्रमक खेळ असून प्रत्येकाने संयम ठेवणे काळाची गरज आहे. जो संयम ठेवतो तोच भविष्यात यशस्वी होतो, असे मार्गदर्शन केले. कबड्डी स्पर्धेचे औचित्य साधून गुढीपूरवाडीतील दानशूर व्यक्तिमत्व प्रकाश पांगुळ यांचा मित्रमंडळातर्फे सत्कार करण्यात आला. राज्याचा आदिवासी गिरीजन पुरस्कार प्राप्त मसके व पद्मश्री गंगावणे यांना गौरविण्यात आले. सागर पांगुळ यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षक पांडुरंग आटक यांनी प्रास्ताविक केले. या स्पर्धेत जिल्ह्यातील तेरा संघ सहभागी झाले आहेत.
--
खिलाडूवृत्ती जोपासा
श्री. रणसिंग यांनी, प्रत्येकाने खिलाडूवृत्ती जोपासणे गरजेचे आहे. स्पर्धेत जय-परायज आहेच; मात्र जो खिलाडूवृत्तीने वाटचाल करतो, तो आयुष्यात यशस्वी होतो. ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन केले आहे, असे सांगितले. ज्येष्ठ साहित्यिक रणसिंग यांनी अलीकडे कबड्डी स्पर्धेमध्ये खिलाडूवृत्ती लोप पावत चाललेली दिसून येत आहे. हा प्रकार बंद होणे काळाची गरज आहे, असे सांगत स्पर्धकांनी पंचांना आव्हान देऊ नये, असे आवाहन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com