लक्ष्मीबाई माधव विद्यालयात
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

लक्ष्मीबाई माधव विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

97744
सावंतवाडी ः यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करताना दीपाली भालेकर आदी.

लक्ष्मीबाई माधव विद्यालयात
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
सावंतवाडी, ता. २२ ः येथील लक्ष्मीबाई मुरारी माधव विद्यालय आदर्श पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद शाळा नं. ६ भटवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये यश मिळविले. याबाबत माजी नगरसेविका दीपाली भालेकर यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत तिसरीचा प्रथमेश लांबर हा १७८ गुणांसह जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत ९ वा, तर तालुक्यात दुसरा आला. त्याने सुवर्णपदक पटकावले.
चौथीमधून देवेश जाधव (१४६) याने रौप्य, दुसरीमधून वैष्णवी खोसरे व शिवराज साळुंखे हे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शिष्यवृत्ती परीक्षेत चौथीमधून देवेश जाधव (२०६), सावली पटेल (१३८) गुण मिळवून उत्तीर्ण झाली. चैताली पास्ते हिला ११४ गुण मिळाले. यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका व मुख्याध्यापक सायली लांबर, गीता सुतार यांचे मार्गदर्शन लाभले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिषा राणे, माजी नगरसेविका दीपाली भालेकर, शिक्षणतज्ज्ञ दिलीप भालेकर, सावंतवाडी केंद्रप्रमुख स्नेहा लंगवे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष समीक्षा खोचरे, बालवाडीताई गावडे आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com