‘सुपरस्टार’ सर्कसला कुडाळात प्रतिसाद वाढला

‘सुपरस्टार’ सर्कसला कुडाळात प्रतिसाद वाढला

97740
कुडाळ ः ‘सुपरस्टार’ सर्कसच्या कलाकारांनी चित्तथरारक कसरती सादर केल्या.(छायाचित्र ः अजय सावंत)

‘सुपरस्टार’ सर्कसला
कुडाळात प्रतिसाद वाढला
कुडाळ, ता. २२ ः येथील नवीन एसटी डेपो (महामार्गालगत) मैदानावर सुरू असलेल्या ‘सुपर स्टार’ सर्कसची सिंधुदुर्गवासीयांना भुरळ पडली आहे. दररोज सायंकाळी चार आणि सात, असे या सर्कसचे दोन शो होत असून आबालवृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्हावासीयांना ही सर्कस मनोरंजनाची मेजवानी ठरली आहे. येथे पुढील काही मोजकेच दिवस ही सर्कस असेल. त्यामुळे जिल्हावासीयांनी आनंद घ्यावा, असे आवाहन ‘सुपरस्टार’ सर्कसचे मालक प्रकाश माने, विजय माने यांनी केले आहे.
सिंधुदुर्गवासीयांच्या मनोरंजनासाठी ३ एप्रिलपासून येथे मध्यवर्ती ठिकाणी सुपरस्टार सर्कस सुरू झाली आहे. या सर्कसमध्ये कलाकारांच्या विविध चित्तथरारक कसरती, मौत का कुवाँ, दुचाकी स्टंट, हवाई झुला, रशियन रिंग डान्स, सिंगल व डबल सायकल स्टंट यांसह अनेक खेळांचे थरार लक्षवेधी ठरत आहेत. चित्तथरारक कसरती प्रेक्षकांना अचंबित करीत आहेत. त्यात अधूनमधून विदुषकांची धमाल कॉमेडी प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. प्रारंभी काही दिवस दररोज तीन शो झाले; मात्र सध्या उष्मा वाढल्याने दुपारी एकचा शो रद्द केला आहे. त्यामुळे दररोज सायंकाळी चार आणि सातला असे दोन शो प्रेक्षकांना दाखविले जात आहेत, असे माने यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com