

बार कौन्सिलमधील २० टक्के जागा
हव्यात महिलांसाठी
रत्नागिरी ः गत काही वर्षांत महिला वकिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्या सक्षमपणे आपले कर्तृत्वही सिद्ध करत आहेत. आपल्या वकील भगिनींच्या नेतृत्वगुणास वाव मिळावा व बार कौन्सिलमधील त्यांचा सहभाग वाढावा या दृष्टिकोनातून बार कौन्सिलमधील २५ पैकी किमान ५ जागा महिला वकिलांसाठी राखीव करण्यात याव्यात व तशी कायदेशीर तरतूद करण्यात यावी, अशी मागणी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे अध्यक्ष यांच्याकडे एका पत्राद्वारे सदस्य पारिजात पांडे यांनी केली आहे. बार कौन्सिलच्या आगामी फुल हाऊस मीटिंगमध्ये मांडणार आहेत, असेही म्हटले आहे. या मागणीला येथील ज्येष्ठ विधीज्ञ अविनाश तथा भाऊ शेट्ये यांनी दुजोरा दिला आहे.
या प्रस्तावात पांडे यांनी म्हटले आहे, यामुळे नेतृत्व गुणांना वाव मिळेल आणि निर्णयप्रक्रियेतील त्यांचा सहभागही वाढेल. आधुनिक काळात स्त्री शिक्षणाचा मार्ग दाखवणाऱ्या महाराष्ट्रात अशाप्रकारे महिलांना संधी उपलब्ध करून देणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. या प्रस्तावाबाबत काही मत, सूचना असल्यास जिल्हा, तहसील बार असोसिएशनचे पदाधिकारी व सहकारी वकील बंधूभगिनी यांनी कळवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. पांडे यांनी असेही प्रस्तावित केले आहे की, अशाप्रकारे विनंती करणारे पत्र देशभरातील सर्व बार कौन्सिलला आणि बार कौन्सिल ऑफ इंडियाला तसेच केंद्र सरकारच्या विधी आणि न्याय विभाग खात्याला पाठवावे आणि हा ठरावसुद्धा पाठवावा. दरम्यान, भारतीय राज्यघटनेप्रमाणे संधीची समानता निर्माण होण्यासाठी पांडे यांनी केलेली मागणी योग्य आहे, असे अॅ़ड. शेट्ये यांनी म्हटले आहे.
-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.