बांदा केंद्रशाळेत गुरुवारी
‘पहिले पाऊल’ मेळावा

बांदा केंद्रशाळेत गुरुवारी ‘पहिले पाऊल’ मेळावा

97748
बांदा केंद्रशाळा

बांदा केंद्रशाळेत गुरुवारी
‘पहिले पाऊल’ मेळावा

राज्यस्तरीय उपक्रमाचे आयोजन

बांदा, ता. २२ ः पहिलीतील शाळा प्रवेश हा मुलांच्या जीवनातील संस्मरणीय बनावा, मुलांना शाळेप्रती गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने दरवर्षी राज्याच्यावतीने प्रत्येक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव कार्यक्रम घेण्यात येतो. यावर्षी राज्याचा ‘पहिले पाऊल’ हा राज्यस्तरीय मेळावा शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन व प्रथम एज्युकेशन संस्थेतर्फे जिल्ह्यातील बांदा नं. १ केंद्रशाळेत गुरुवारी (ता. २७) सकाळी आठला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला आहे. यावेळी ‘माझी ई-शाळा’ उपक्रमाचेही उद्‍घाटन करण्यात येणार आहे.
बांदा केंद्रशाळेची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात १८५३ मध्ये झाली. सुमारे १७० वर्षे झालेल्या व जिल्ह्यातील उपक्रमशील शाळा म्हणून ख्याती असलेल्या शाळेला राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. मेळाव्यात पहिल्या इयत्तेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे पारंपरिक व जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी राज्य शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक, राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, ''डाएट''च्या प्राचार्या अनुपमा तावशीकर, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब आदी उपस्थित राहणार आहेत. उपस्थित राहावे, असे आवाहन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नीलेश मोरजकर, मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com