कथ्थक नृत्य धडे

कथ्थक नृत्य धडे

८ (पान ६ साठी, संक्षिप्त पट्टा)

केवळ फोटो- (आवश्यक)

- rat२२p७.jpg -
९७७७७

शिरगाव ः वामन नेने हायस्कूलमध्ये व्यक्तिमत्व विकास शिबिरात विद्यार्थिनींना कथ्थक नृत्याचे धडे देताना सोनम जाधव. तीन चाललेल्या या शिबिरात हस्तमुद्रा, पदन्यास आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
------

- rat२२p८.jpg ः
९७७५४
चिपळूण ः आरती निराधार सेवा फाउंडेशनच्या भेटीप्रसंगी रंजिता फाउंडेशनचे पदाधिकारी.
----
आरती निराधार सेवा फाउंडेशनला
रंजिता चॅरिटेबल फाउंडेशनची भेट

चिपळूण ः तालुक्यातील पेढे येथील आरती सेवा फाउंडेशन या सामाजिक संस्थेला रंजिता चॅरिटेबल फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने नुकतीच भेट दिली. संस्थेला गरजेच्या भेटवस्तू रूपात मदत केली. रंजिता चॅरिटेबल फाउंडेशनच्या अध्यक्षा रंजिता ओतारी, वनिता काशीद, उपाध्यक्षा दीप्ती सावंतदेसाई, सदस्य सुनील सावंतदेसाई, अश्विनी ताम्हणकर यांनी भेट दिली. वसतिगृहातील मुलांनी स्वागतगीत गात उपस्थितांचे स्वागत केले. मुलांनी आपले कलागुण सादर केले. शर्मिला महाकाळ यांनी वसतिगृहातील सभासदांविषयी माहिती दिली. संस्थेच्या अध्यक्षा अनिता नारकर यांनी रंजिता ओतारी आणि पदाधिकारी यांचे स्वागत केले. निरपेक्ष भावनेने आरती फाउंडेशनचे सेवाकार्य सुरू आहे. समाजातील संस्थांनी, एक सामाजिक बांधिलकी, सामाजिक कर्तव्य या भावनेतून सहकार्य करणे गरजेचे आहे, असे विचार ओतारी यांनी मांडले. रंजिता चॅरिटेबल फाउंडेशन ही नोंदणीकृत सेवाभावी संस्था आहे जी अनेक वर्षांपासून विविध क्षेत्रात लोकोपयोगी काम करत आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, आरोग्यविषयक शिबिर, विविध सरकारी दाखल्यांसाठी मार्गदर्शन शिबिरं असे अनेक उपक्रम रंजिता चॅरिटेबल फाउंडेशनने यशस्वीपणे राबवले आहेत. विधवा, निराधार महिलांसाठी, ज्येष्ठांसाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवत त्यांच्याप्रती आपली संवेदना वेळोवेळी व्यक्त केली आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा गौरव, महिलांसाठी विशेष उपक्रम, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचं आयोजन करत संपूर्ण जिल्ह्यात आपल्या सामाजिक कामांचा ठसा हा उमटवला आहे.
--

रिंगणे गावाला बीडीओंची भेट

लांजा ः संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता समिती अध्यक्ष तथा गटविकास अधिकारी यशवंत भांड व सचिव कांबळे यांनी रिंगणे गावाला भेट दिली. या वेळी एकूणच गाव व गावातील शासकीय कार्यालये स्वच्छ व निटनेटकी असल्याचे निदर्शनास आल्याने त्यानी रिंगण्याचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांचे कौतुक केले आहे. प्रत्येक गाव स्वच्छ व सुंदर असावा, रोगमुक्त असावा यासाठी शासन कायम आग्रही असते. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता समितीमार्फत गावांमध्ये जाऊन पाहणी केली जाते व स्वच्छता कशी राखावी याबद्दल मार्गदर्शन केले जाते. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता समिती अध्यक्ष तथा गटविकास अधिकारी यशवंत भांड व सचिव कांबळे यांनी रिंगणे गावाला भेट दिली. या वेळी त्यांनी गावातील शासकीय कार्यालये व एकूणच गावाची पाहणी केली. या वेळी सरपंच संजय आयरे, उपसरपंच पांडुरंग पेडणेकर, सदस्या आर्या आयरे, ग्रामसेवक तेजस वडवलकर, प्राथमिक आरोग्य केंद्र रिंगणे वैद्यकीय अधिकारी डॉ. मंडपे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com