लोकशाही आघाडीचा आज चिपळुणात मेळावा

लोकशाही आघाडीचा आज चिपळुणात मेळावा

९ (पान ६ साठी)

लोकशाही आघाडीचा आज चिपळुणात मेळावा

माध्यमिक सेवक पतपेढी निवडणूक ; ३० एप्रिलला मतदान

पावस, ता. २२ ः रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढीची पंचवार्षिक निवडणूक ३० एप्रिलला होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने लोकशाही आघाडीचा जिल्हा मेळावा चिपळुणातील खेर्डी-चिंचघरी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये रविवारी (ता. २३) सकाळी १० वाजता होणार आहे. शिक्षक लोकशाही आघाडीचे (टीडीएफ) सदाशिव चावरेकर, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य सचिव आकाश तांबे उपस्थित राहणार आहेत.
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी टीडीएफ, कास्ट्राईब शिक्षक संघटना , मुख्याध्यापक संघ,शिक्षक सेना, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना, प्रयोगशाळा सहाय्यक कर्मचारी व ग्रंथपाल संघ यांची लोकशाही आघाडी निर्माण करण्यात आली आहे. या आघाडीतर्फे प्रचार सुरू आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने लोकशाही आघाडीच्या सर्व घटक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये निवडणूक चिन्ह आणि जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मेळाव्याला टीडीएफचे अध्यक्ष सागर पाटील, कास्ट्राइब संघटनेचे अध्यक्ष प्रदीप वाघोदे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विजय पाटील, शिक्षक सेनेचे अध्यक्ष संदीप कांबळे, टीडीएफ संघटनेचे कार्याध्यक्ष संभाजी देवकते आदी उपस्थित राहणार आहेत.
--

लोकशाही आघाडीचा विजय निश्चित
लोकशाही आघाडीने जिल्ह्यामध्ये प्रचार आघाडी उघडली असून विरोधकांच्या सर्व गैरकारभार पुराव्यानिशी सभासदांसमोर मांडला आहे. त्यामुळे लोकशाही आघाडीचा या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने विजय निश्चित असल्याचे टीडीएफचे अध्यक्ष सागर पाटील यांनी स्पष्ट केले. लोकशाही आघाडीने सभासदांच्या मनातील जाहीरनामा तयार केला असून जिल्हा मेळाव्यामध्ये या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com