राजापूर-नव्या रुपातील संगीत वस्त्रहरण आज मुंबईत

राजापूर-नव्या रुपातील संगीत वस्त्रहरण आज मुंबईत

(पान २ साठी)


-rat२२p११.jpg ः
९७७५६
राजापूर ः नव्या संचातील वस्त्रहरण नाटकाचे सादरीकरण करताना स्थानिक कलाकार.
-
नव्या रुपातील संगीत वस्त्रहरण आज मुंबईत

राजापूर, ता. २२ ः वस्त्रहरण नाटकाच्या माध्यमातून मालवणी भाषेचा झेंडा सातासमुद्रापार नेणारे तालुक्यातील ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांनी माडबन गावातील स्थानिक मुलांच्या संचातील ‘संगीत वस्त्रहरण’ नाटक तयार केले आहे. हे नाटक मुंबईला निघाले असून त्याचे रविवारी (ता. २३) मुंबई नगरीमध्ये सादरीकरण होणार आहे. प्रभादेवी मुंबई येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे सायं. ७ वा. हा नाट्यप्रयोग होणार आहे.
मालवणी भाषेतील वस्त्रहरण नाटक दिवसागणिक प्रयोगांच्या नवनव्या विक्रमाची नोंद करत असताना गवाणकर यांनी स्थानिक गावातील कलाकारांना सोबत घेऊन नव्या संचातील वस्त्रहरण नाटकाची निर्मिती केली आहे. गवाणकर हे माडबन गावचे मूळ रहिवाशी असून, याच गावातील तरुण-तरुणींना कलाकार म्हणून नव्या संचातील वस्त्रहरण नाटकामध्ये संधी दिली आहे. नव्या संचातील नाटाकाचा प्रयोग त्यांनी माडबन येथील जिल्हा परिषद शाळेच्या शताब्दी महोत्सवाच्या कार्याक्रमामध्ये सादरीकरण झाले होते. त्या वेळी प्रेक्षकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर, जानशी येथेही प्रयोग झाला होता. आता या नव्या संचातील वस्त्रहरण नाटकाचा प्रयोग थेट मुंबईला उद्या होणार आहे. नव्या संचातील वस्त्रहरण नाटकाचा मुंबई येथे प्रयोग यशस्वी व्हावा म्हणून नाटककार गवाणकर, शैलेश वाघधरे आणि सहकारी, मुंबईस्थित ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत. नव्या संचातील वस्त्रहरण नाटकाच्या मुंबई येथे होणाऱ्या नाट्यप्रयोगाला साऱ्‍यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com