मंत्री चव्हाण यांचा धामणसेवासियांतर्फे सत्कार

मंत्री चव्हाण यांचा धामणसेवासियांतर्फे सत्कार

(पान २ साठी)

rat२२p१५.jpg-
९७७६२
रत्नागिरी ः सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांचा धामणसेवासियांतर्फे सत्कार करताना सरपंच अमर रहाटे, उमेश कुलकर्णी आणि ग्रामपंचायत सदस्य.
-----------
मंत्री रवींद्र चव्हाण यांचा सत्कार

रत्नागिरी, ता. २२ ः तालुक्यातील धामणसे गावात राज्याचे सार्वजनिक बांधकामंत्री आणि भाजपा नेते रवींद्र चव्हाण यांनी विशेष लक्ष देत हटवाडी, चौकेवाडी, बौद्धवाडी, खरवते गावाला जोडणारा रस्ता व पूल मंजूर केला. या कामासाठी ३ कोटी रुपये मंजूर झाले असून. याबद्दल धामणसेवासियांतर्फे सरपंच अमर रहाटे, उपसरपंच अनंत जाधव आणि ग्रामपंचायत सदस्यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांचा रत्नागिरीत पुष्पहार आणि गणपतीपुळे मंदिराची छायाचित्र फ्रेम देऊन सन्मान केला.
भाजपाच्या पदाधिकारी मेळाव्याकरिता मंत्री चव्हाण रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. त्या प्रसंगी सरपंच अमर रहाटे यांनी मंत्री चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन आणि धामणसे गावचे सुपुत्र, भाजपा तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी यांचा सन्मान केला. हटवाडीतील पुलाच्या लवकरच कामाला सुरवात होणार असून, त्या वेळीही मंत्री चव्हाण येणार आहेत. या पुलामुळे धामणसेतील हटवाडी, खरवते आदी वाड्यांना दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. पावसाळ्यातील गैरसोय दूर होणार आहे. विद्यार्थी, ग्रामस्थ, महिलांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्यावतीने मंत्री चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांच्यासमवेत बूथप्रमुख विश्वास धनावडे, ग्रामपंचायत सदस्य वैष्णवी धनावडे, अनघा जाधव, ऋतुजा कुळकर्णी, रेश्मा डाफळे, माजी उपसरपंच मुकुंद जोशी आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com