गावखडीतील रामेश्वर मंदिरात आंब्याची आरास

गावखडीतील रामेश्वर मंदिरात आंब्याची आरास

rat२२१६.txt

बातमी क्र. १६ (पान २ साठी)

फोटो ओळी
-rat२२p१३.jpg-
९७७५८
गावखडी (ता. रत्नागिरी) ः गावखडी येथील श्री रामेश्वर मंदिरात केलेली आंब्याची आरास.
---

गावखडीतील रामेश्वर मंदिरात आंब्याची आरास

पावस, ता. २२ ः रत्नागिरी तालुक्यातील गावखडी गावचे श्रद्धास्थान असलेले श्री देव रामेश्वर या देवस्थान येथे अक्षयतृतीयेनिमित्त यावर्षी प्रथमच गावातील सर्व आंबा बागातदारांनी संकल्प करून हापूस आंब्याची आरास केली.
पुणे येथील दगडूशेठ हलवाई या गणपतीसमोर दरवर्षी हापूस आंब्यांची आरस केली जाते. त्यामुळे हापूस आंब्याची चर्चा आपोआप होते. गावखडी येथील श्री देव रामेश्वर येथे दरवर्षी महाशिवरात्रीच्या दरम्यान तांदळाची आरस करून सजवले जाते. त्याप्रमाणे यावर्षी गावातील आंबा व्यापाऱ्यांनी आंब्याची आरास करण्याचा संकल्प केला. आंबा बागायतदार व व्यापारी यांनी आपल्या बागेतील पिकलेल्या आंब्याचे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सकाळी सात वाजता ३१५ पिकलेल्या आंब्याची आरस करत आंब्याची पूजा बांधली. त्यानंतर देवस्थान समितीच्या वतीने हापूस आंब्याची बांधली पूजा मानवल्यानंतर त्यातील एकेक आंबा प्रसाद म्हणून भक्तांना देण्यात आला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com