व्यावसायिक नाटक, सिनेमात या

व्यावसायिक नाटक, सिनेमात या

97802
कणकवली : एसटी महामंडळाच्या नाट्यस्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्‍या सिंधुदुर्ग विभागातील कलाकारांचा सत्‍कार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आणि अभिनेते माधव अभ्यंकर यांच्या हस्ते झाला.


व्यावसायिक नाटक, सिनेमातही या

अभिनेते अभ्यंकर; ‘एसटी’तील कलाकारांना कणकवलीत आवाहन


कणकवली, ता.२२ : एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी आपले कलागुण राज्‍यनाट्य स्पर्धेपुरतेच मर्यादित ठेवू नयेत. व्यावसायिक मराठी नाटके, सिनेमा आणि मालिकांमध्येही काम करावे, असे आवाहन ‘अण्णा नाईक’ फेम अभिनेते माधव अभ्यंकर यांनी केले.
येथील आचरेकर प्रतिष्‍ठानमध्ये एसटी महामंडळाच्या राज्‍यनाट्य स्पर्धेतील विजेत्‍या कलाकारांच्या सत्‍कारप्रसंगी अभिनेते अभ्यंकर बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने होते.
अभ्यंकर म्‍हणाले, ‘कणकवली ही नाट्य कलाकारांची सांस्कृतिक राजधानी आहे. आचरेकर प्रतिष्‍ठानच्या या नाट्यगृहात दरवर्षी राज्‍यातील विविध संघ आपली कला सादर करण्यासाठी येत असतात. या रंगमंचावर नाट्यकला सादर केलेल्या अनेक कलावंतांनी सिने, नाट्यसृष्‍टीत पदार्पण केले आहे.
कार्यक्रमात महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या हस्ते महामंडळाच्या ५० व्या आंतरविभागीय नाट्यस्पर्धा २०२२-२३ चा बक्षीस वितरण समारंभ, तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या कबड्डी संघाचा सत्कार करण्यात केला.’ यावेळी राज्‍य परिवहन महामंळाचे महाव्यवस्थापक अजित गायकवाड, मुख्य कामगार अधिकारी राजेश कोनवडेकर, उपमहाव्यवस्थापक श्रीनिवास जोशी, नाट्य लेखक विलास खानोलकर, सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक अभिजित पाटील, विभागीय वाहतूक अधिकारी व्ही. एस. देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी प्रथम पारितोषिक विजेते सिंधुदुर्ग विभागाचे ‘दशावतार गोविंद हरिश्चंद्राची’ नाटकातील कलाकार तसेच चारही प्राथमिक फेरीतील पारितोषिक विजेते कलाकार, कबड्डी संघातील खेळाडूंचा सन्मान केला. अजित गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. शाम सावंत, सोनल कदम यांनी सूत्रसंचालन केले. अभिजित पाटील यांनी आभार मानले.
---
इतर मान्यवरांची मनोगते
शेखर चन्ने म्हणाले, ‘कोकणच्या मातीत अनेक कलाकार आहेत. त्यामुळेच सलग चार वर्षे आंतरविभागीय नाट्यस्पर्धेत सिंधुदुर्ग विभागाच्या संघाला प्रथम क्रमांक मिळत आहे. या कलाकारांनी आपली कला जिवंत ठेवून आपल्याबरोबरच महामंडळाचे नाव उज्ज्वल करावे.’
विलास खानोलकर म्हणाले, ‘दशावतार गोविंद हरिश्चंद्राची’ या माझ्या नाटकाला न्याय देण्याचे काम रंगकर्मी सुहास वरूणकर व त्यांच्या कलाकारांच्या टीमने केले आहे. त्यामुळे मला पुन्हा नाटक लिहायची प्रेरणा मिळाली आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com