ःएक रस्ता असताना त्याच जमिनित दुसरा रस्ता

ःएक रस्ता असताना त्याच जमिनित दुसरा रस्ता

२१ (पान ५ साठी)


-ratchl२२१.jpg ः
९७७८३
चिपळूण ः कुडप येथील बिबवीचा माळ ते देवशेतवाडी दरम्यान करण्यात आलेला रस्ता.
----------
रस्ता असताना त्याच जमिनीत दुसरा रस्ता

कुडपचे नितीश शिर्के करणार उपोषण ; ग्रामपंचायतीवर आक्षेप

चिपळूण, ता. २२ ः तालुक्यातील कुडप येथील नितीश केशव शिर्के याने महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे. आपल्या जमिनीतून ग्रामपंचायतीने रस्ता केला आहे. एक रस्ता आपल्या जमिनीतून असताना दुसरा रस्ता अनधिकृतपणे केला आहे. त्यास स्थगिती द्यावी व नोंद रद्द करावी, अशी मागणी शिर्के यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
गट क्र. २०१ (१)(३) याचे सातबारे शिर्के यांच्या मालकीचे आहेत. या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या म्हणण्यानुसार १ किमी लांबीचा सहा फुटी रूंदीचा रस्ता नोंद आहे; मात्र त्या रस्त्यासाठी जमीन मालकाची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. संमतीपत्र व सातबाऱ्याची नोंद नाही. ग्रामपंचायतीच्या म्हणण्यानुसार, बिबवीचा कातळ ते देवशेतवाडी हा रस्ता बनवण्याची मंजुरी ग्रामपंचायतीने आणली असून हा रस्ता लिमेचे येथून सुरू केला आहे. देवशेतवाडीमध्ये जाणारा रस्ता पूर्वीपासून अस्तित्वात असून त्या रस्त्यासाठी आपली साडेपंधरा गुंठे जागा गेली आहे. आता नव्या रस्त्यासाठी कुडप ग्रामपंचायतीने साडेचार गुंठे जागा घेतली आहे. याबाबत पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्याकडे तक्रार करूनही दखल घेतलेली नाही. यासाठी पंचायत समितीसमोर एकदा उपोषणही केले. गटविकास अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यासमवेत पाहणीदेखील केली; परंतु त्यावर कारवाई झालेली नाही; मात्र फक्त आश्वासन देऊन आपले उपोषण मागे घेण्यास सांगितले. त्यामुळे आता या अर्जाची दखल न घेतल्यास महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा इशारा शिर्के यांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com