सावर्डे-गळफास घेऊन प्रौढाची आत्महत्या

सावर्डे-गळफास घेऊन प्रौढाची आत्महत्या

प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

सावर्डे, ता. २२ ः चिपळूण तालुक्यातील दहीवली बुद्रुक-निम्मेवाडी येथील बळीराम शंकर घाग (वय ५०) यांनी राहत्या घरी गुरुवारी (ता. २०) रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती त्याचे नातेवाईक भास्कर वासू कदम यांनी सावर्डे पोलिस ठाण्यात दिली. बळीराम घाग नोकरीनिमित्त खेर्डीत राहत होते. गुरुवारी रात्री ते आपल्या घरी गावी आले. मात्र सकाळी त्यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शन आले. त्याची मुलगी बारावीला असून ती मुंबईला राहते. सावर्डे पोलिस ठाण्याचे प्रदीप गमरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून, सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. अजय पाटील यांनी शवविच्छेदन केले. आत्महत्येचे कारण उशिरापर्यंत समजू शकले नसले, तरी सावर्डे पोलिस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक सचिन धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप गमरे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com