नेमळे शाळेचा उद्या 
शतक महोत्सव सोहळा

नेमळे शाळेचा उद्या शतक महोत्सव सोहळा

नेमळे शाळेचा उद्या
शतक महोत्सव सोहळा

सावंतवाडी, ता. २९ ः जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नेमळे नं. १ या शाळेचा शतक महोत्सवी सोहळा सोमवारी (ता. १) होत आहे. नेमळे नं. १ या शाळेची स्थापना १ ऑगस्ट १९२० मध्ये झाली. शाळेला १०० वर्षे पूर्ण झाल्याने शाळेचे माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थांनी शतक महोत्सवी सोहळ्याचे आयोजन सोमवारी (ता.१) सायंकाळी सहाला केले आहे.
या कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तम पांढरे, माजी आमदार राजन तेली, माजी सभापती पंकज पेडणेकर, माजी उपसभापती संदीप नेमळेकर, पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ, नेमळे सरपंच दिपिका भैरे, उपसरपंच सखाराम राऊळ, शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, गट शिक्षणाधिकारी कल्पना बोडके, केंद्रप्रमुख प्रमोद पावस्कर, शतक महोत्सव कमिटी अध्यक्ष आ. भि. राऊळ उपस्थित आदी राहणार आहेत. यावेळी पाहूण्यांचे स्वागत, दीपप्रज्वलन, प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय, स्मरणिकेचे प्रकाशन, सत्कार सोहळा, बक्षीस वितरण, पाहुण्यांचे मनोगत, आभार प्रदर्शनासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन शाळा महोत्सव समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ, पालक-शिक्षक संघ, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नेमळे नं. १ च्यावतीने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com