जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेवर रत्नागिरीमधील खेळाडूंचे वर्चस्व

जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेवर रत्नागिरीमधील खेळाडूंचे वर्चस्व

५ (पान ६ साठी)


- rat२९p५.jpg-
९९३०६
रत्नागिरी ः तायक्वॉंदो स्पर्धेत वर्चस्व प्रस्थापित केलेला रत्नागिरीचा संघ.
--

तायक्वॉंदो स्पर्धेवर रत्नागिरीतील खेळाडूंचे वर्चस्व


१५ सुवर्ण, १५ रौप्यसह ४० पदकांची कमाई ; प्रथम क्रमांकाचा चषक

रत्नागिरी, ता. २९ ः १६व्या रत्नागिरी जिल्हा ओपन चॅलेंज क्युरोगी व १०व्या पुमसे तायक्वॉंदो चॅम्पियनशिप दापोलीतील सेवावृत्ती शिंदे गुरूजी सभागृहात झाली. रत्नागिरी तालुक्यातील खेळाडूंचा दबदबा शेवटपर्यंत राहिला. रत्नागिरीमधील खेळाडूंनी एकूण १५ सुवर्ण, १५ रौप्य व १० कास्यपदके अशी ४० पदकांची कमाई केली. रत्नागिरीच्या खेळाडूंनी क्युरोगी प्रकारात मिळवलेल्या सर्वाधिक पदकांमुळे मानाचा प्रथम क्रमांकाचा चषक रत्नागिरीच्या खेळाडूंना मिळाला. हा चषक तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे खजिनदार आणि जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व्यंकटेशराव कररा यांच्या हस्ते शाहरूख आणि भागवत यांनी स्वीकारला.
पदक विजेत्या खेळाडूंची नावे अशी ः सुवर्णपदक- स्वरा साखळकर, भक्ती डोळे (दोघीही सबज्युनियर), रावी वारंग (स्पेशल कॅटेगिरी), आर्या शिवडे (कॅडेट), ऋतिक तांबे, ओम अपराज (सर्व ज्युनिअर), अमेय सावंत, आर्या शिवडे, वेदांत चव्हाण (सर्व सीनियर), रूद्र शिंदे (५० किलोखालील), राधा रेवाळे (१६ किलोखालील गट), मानस शिवगण (२७ किलोखालील वजनी गट), वेदिका पवार (१८ किलोखालील गट).
रौप्य पदक- सान्वी मयेकर, मृदुला पाटील (दोघीही कॅडेट), सान्वी मयेकर, समर्था बने (दोघीही सीनियर), जिया केतकर (५१ किलोखालील गट), आर्या शेणवी (४५ किलोखालील गट), दिव्यांका घाटगे (कॅडेट), सुजल सोळंखे (सीनियर), सोहम सावंतदेसाई (७८ किलोखालील गट).
कास्यपदक विजेते- रोहित कुंडकर (स्पेशल कॅटेगिरी), स्वरा साखळकर (कॅडेट), मृदुला पाटील, सान्वी मयेकर, मृदुला पाटील (सर्व ज्युनिअर), श्रीनिधी पाटील (१६ किलोखालील गट), विधान कांबळे (१८ किलोखालील गट), साईराज चव्हाण (२३ किलोखालील गट), यश भागवत (२९ किलोखालील गट), ऋतिका पांचाळ (२२ किलोखालील गट), पार्थ कांबळे (४५ किलोखालील गट), प्रसन्ना गावडे, पार्थ गावडे (सीनियर), यश परकर, साकेत परकर (सबज्युनिअर). पुमसे निकाल- स्वरा साखळकर (फ्री स्टाईल सुवर्णपदक), स्वरा साखळकर (सिंगल रौप्य पदक). रत्नागिरीमधील या सर्व विजेत्या खेळाडूंना एसआरके तायक्वॉंदो क्लबचे शाहरूख, जय भैरी तायक्वांदो क्लबचे भागवत, गणराज तायक्वांदो क्लबचे प्रशांत मकवाना यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com