ग्रंथ प्रदर्शन

ग्रंथ प्रदर्शन

३ (पान २ साठी, संक्षिप्त पट्टा)

केवळ फोटो
- rat२९p१.jpg-
९९२८६
रत्नागिरी ः जागतिक ग्रंथदिनानिमित्त येथील शासकीय विभागीय ग्रंथालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. दत्ता पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
---
देवरुखात आज विविध विकासकामांचा आरंभ

साडवली ः देवरूख नगरपंचायतीने सुमारे २५ कोटी खर्चून उभारलेल्या महत्वाकांक्षी घनकचरा प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी (ता. ३०) सायं. ५ वा. पार पडणार आहे. तसेच नगर पंचायतीच्या विविध विकासकामांचा आरंभही पालकमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. त्यात २७ लाख रु. खर्चून बांधण्यात येणाऱ्या नदीपलिकडील जि. प. शाळा नं. २च्या दोन वर्गखोल्यांचे व गणेश विर्सजन घाट कुंभारवाडी या कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. नगरपंचायत परिसरात उभारलेल्या सोनचिरैया या शहर उपजीविका केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री सामंत करणार आहेत. या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बांधकाम सभापती संतोष केदारी यांनी केले आहे.
--

फोटो ओळी
-ratchl२९४.jpg ः
९९२९३
शिर्डी ः संस्थेच्या विश्वस्त व प्राचार्या डॉ. वेदांती सावंत यांचा गौरव करण्यात आला
-
गावडे अध्यापक महाविद्यालयात स्नेहवृद्धी मेळावा

चिपळूण ः तालुक्यातील मंदार एज्युकेशन सोसायटी येथील लेफ्टनंट शशिकांत गावडे अध्यापक महाविद्यालयाच्या (बीएड्) १९९२-९३ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहवृद्धिंगत मेळावा नुकताच शिर्डी येथे झाला. संस्थेच्या विश्वस्त व बीएड् कॉलेजच्या प्राचार्या डॉ. वेदांती सावंत तसेच संस्थेचे सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास सावंत, तत्कालीन प्राध्यापिका थोरात उपस्थित होत्या. माजी विद्यार्थ्यांतर्फे त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. महाविद्यालयाच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून महाविद्यालयाचे व प्राचार्यांचे आभार मानले. बीएड् महाविद्यालयाकडून प्राध्यापक योगेश चोगले व अजित खेडेकर उपस्थित होते.
--

समृद्धी बाईंगची आदर्श विद्यार्थिनी म्हणून निवड

साखरपा ः जिल्हा परिषद कन्याशाळेतील सातवीची विद्यार्थिनी समृद्धी बाईंग हिची आदर्श विद्यार्थिनी म्हणून निवड करण्यात आली आहे. विद्यार्थिनीमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी शैक्षणिक प्रगतीबरोबर त्यांचे शिक्षक, सहकारी विद्यार्थिनी यांच्याबरोबर असलेली वागणूक, सहकारी वृत्ती, इतरांना समजून घेण्याची भावना, शालेय शिस्त, शालेय परिपाठ, शालेय स्वच्छतेबाबत जाणीव, कला, कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण या विषयीची आवड तसेच शालेय व्यवस्थापन व शाळेच्या एकूण शैक्षणिक प्रगतीमधील भूमिका या सर्वांचा विचार करून दरवर्षी सातवीतील विद्यार्थिनींची निवड केली जाते. या वेळी शाळेने समृद्धीची आदर्श विद्यार्थिनी म्हणून निवड करण्यात आली. तिला स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी मुख्याद्यपक संजय जाधव, व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुग्धा जोगळेकर, उपाध्यक्ष विश्वनाथ शिंदे, हर्षा आठल्ये, रिया कदम, सर्व शिक्षकवृंद व बहुसंख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
-

मनोहर गुरव यांना पुरस्कार

देवरूख ः सामाजिक कार्यकर्ते, माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ मुंबईचे संगमेश्वर तालुकाध्यक्ष, महाराष्ट्र समविचारी मंच रत्नागिरीचे संगमेश्वर तालुकाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असो. रत्नागिरीचे सहसचिव, त्याचप्रमाणे मयूर स्पोर्ट्स अॅकॅडमी देवरूखचे अध्यक्ष मनोहर गुरव यांना नवराष्ट्र रत्नागिरी सन्मान सोहळ्यामध्ये आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराकरिता निवड करण्यात आली आहे. अनेक वर्षे सामाजिक, क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून अनेक संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांना यापूर्वी त्यांच्या कार्यासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २९ मे रोजी सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे मनोहर गुरव यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com