रस्त्याची उंची कमी करण्यासाठी निवेदन

रस्त्याची उंची कमी करण्यासाठी निवेदन

४ ( पान २ साठी)

- rat२९p७.jpg ः
९९३२९
मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांना निवेदन देताना श्री सुकाई देवी देवस्थानचे अध्यक्ष शंकर चव्हाण, उपाध्यक्ष गजानन किंजळकर, सेक्रेटरी नरेंद्र चव्हाण आदी.
--

चिपळुणातील रस्त्याची उंची कमी करा

श्री सुकाई देवी देवस्थानचे निवेदन ; जुना पागनाका, गोपाळकृष्णवाडी

चिपळूण, ता. २९ ः शहरातील जुना पागनाका व गोपाळकृष्णवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची उंची कमी करावी, अशी मागणी पाग येथील श्री सुकाई देवी देवस्थानने पालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
येथील पालिकेच्या अखत्यारित असलेला जुना पागनाका व पाग गोपाळकृष्णवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची उंची मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गापेक्षा अधिक आहे. परिणामी, स्थानिकांसह परिसरातील नागरिकांना महामार्ग ओलांडणे तसेच सर्व्हिस रोडने बाजारपेठेकडे जाण्यासाठी अडचणी निर्माण होणार आहेत. श्री सुकाई देवी देवस्थानचे अध्यक्ष शंकर चव्हाण, उपाध्यक्ष गजानन किंजळकर, सेक्रेटरी नरेंद्र चव्हाण यांच्यासह पदाधिकारी, सदस्यांनी शुक्रवारी (ता. २८) एप्रिलला मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, पाग जुना ऑक्ट्रॉय नाका व गोपाळकृष्णवाडी येथे जाणारा रस्ता येथे रस्त्याचे व गटाराचे काम सुरू आहे. पागनाका येथील नगर पालिकेच्या मालकीच्या जुन्या रस्त्याची उंची व गोपाळकृष्णवाडी येथील रस्त्याची उंची ही महामार्गापेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे पाग जोशी आळी, सुकाई मंदिर परिसरातील ग्रामस्थ व रस्त्याच्या पलिकडील भागातील गोपाळकृष्ण वाडी व पागमळा भागातील ग्रामस्थांना महामार्गावरून पलीकडे जाणे तसेच महामार्गाच्या सर्व्हिस रोडवरून पालिकाहद्दीत बाजारपेठेत जाण्यासाठी फार अडचण होणार आहे. या भागामध्ये जवळ जवळ पाच ते सात हजार ग्रामस्थांना ही अडचण व समस्या निर्माण होणार आहे. श्री सुकाई देवी देवस्थान पाग ग्रामस्थ यांचे पारंपरिक शिमगा, दहिहंडी, नवरात्रोत्सव तसेच गणेशोत्सव सण व गणपती विसर्जन यासाठी पलिकडील नदीकडे जाणे फार अडचणीचे होणार आहे. ही समस्या सोडवायची असेल तर नगर पालिकेच्या मालकीचा जुना पागनाका व पाग गोपाळकृष्णवाडीकडे जाणारा रस्ता याची महामार्ग गटाराची परिस्थिती पाहून उंची काही प्रमाणात कमी केली तर या भागातील ग्रामस्थांना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून जाणे-येणे सुरळीत होऊ शकते. पालिका प्रशासनामार्फत या दोन्ही ठिकाणची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून त्या संदर्भात उपाययोजना करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com