कासार्डे हायस्कूलचे ‘एनएमएमएस’मध्ये यश

कासार्डे हायस्कूलचे ‘एनएमएमएस’मध्ये यश

99395
वैदही राणे, वेदिका तेली

कासार्डे हायस्कूलचे ‘एनएमएमएस’मध्ये यश
तळेरे : आठवीसाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या एनएमएमएस परीक्षेत कासार्डे हायस्कूलच्या वैदेही राणे व वेदिका तेली यांनी शिष्यवृत्ती प्राप्त केली. या विद्यार्थिनींना विद्यालयच्या एनएमएमएस शिष्यवृत्ती विभागप्रमुख दीपाली मिठबावकर, संजय भोसले, ऋषिकेश खटावकर, प्रियांका सुतार यांचे मार्गदर्शन लाभले. गुणवंत विद्यार्थिनींचे स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, शिक्षण समिती चेअरमन अरविंद कुडतरकर, माजी कार्याध्यक्ष तथा स्थानिक व्यवस्था समितीचे पदाधिकारी प्रभाकर कुडतडकर, प्राचार्य एम. डी. खाडये, पर्यवेक्षक एन. सी. कुचेकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने अभिनंदन केले.
..............
‘अजिंक्य’च्या कर्ज रक्कम मर्यादेत वाढ
देवगड ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून येथील अजिंक्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्यावतीने सोमवारपासून (ता. १) पतसंस्थेच्या सभासदांसाठी कर्ज रकमेच्या मर्यादेत वाढ करण्याबरोबरच व्याज दरात एक टक्क्याने कपात करण्यात आली आहे. पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. पतसंस्थेने कर्जाची मर्यादा वाढवून ती एक लाख रुपये इतकी केली आहे. कर्जाचा व्याजदर एक टक्क्याने कमी केला आहे. संचालक मंडळाच्या आज झालेल्या सभेत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या योजनेचा नवीन कर्जदारांनी आणि बँकेच्या सभासदांनी लाभ घेण्याचे आवाहन अजिंक्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष नंदकुमार घाटे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com