भडगाव विद्यालयाचा सुवर्णमहोत्सव सोहळा

भडगाव विद्यालयाचा सुवर्णमहोत्सव सोहळा

भडगाव विद्यालयाचा सुवर्णमहोत्सव सोहळा
कुडाळ, ता. २९ ः कडावल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सह्याद्री माध्यमिक विद्यालय भडगाव बुद्रुक व संस्थेच्या सुवर्णमहोत्सव सोहळ्याचे उद्घाटन मंगळवारी (ता. २) सकाळी ९ वाजता गुरुवर्य एम. डी. सावंत यांच्या स्मृतिदिनी आयोजित करण्यात आले आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर उपस्थित राहणार आहेत. ३ ला सायंकाळी ५ वाजता सुवर्णमहोत्सव सोहळ्याची सांगता खासदार विनायक, आमदार वैभव नाईक, ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत, जिल्हा परिषद माजी सदस्य नागेंद्र परब यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थाध्यक्ष शेखर सावंत, मुख्याध्यापक सचिन धुरी, पालक-शिक्षक संघ उपाध्यक्ष विलास परब, संस्था पदाधिकारी व ग्रामस्थांनी केले आहे.
---
तळकटला आज ‘त्याग’ नाटक
सावंतवाडी, ता. २९ ः तळकट-देऊळवाडी येथे उद्या (ता. ३०) रात्री १० वाजता सदाशिव रेमजे लिखित ''त्याग'' हे सामाजिक नाटक सादर करण्यात येणार आहे. या नाटकामध्ये स्थानिक कलाकार सहभागी झाले आहेत. तळकट माऊली मंदिर येथे हे नाटक होणार असून लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
---------------
तेंडोली ते मुणगी रस्ताकामास मंजुरी
कुडाळ, ता. २९ ः तेंडोली येथील आदोसेवाडी ते मुणगी रस्त्याच्या कामाला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते व जिल्हा कार्यकारिणी सदस्य नीलेश तेंडुलकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे या रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले होते. पालकमंत्री चव्हाण यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून ३.५ किलोमीटर रस्त्यासाठी २.८० कोटी रुपये तत्काळ देण्याच्या सूचना देत या कामाला तांत्रिक मंजुरी दिली. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन या रस्त्याचे काम सुरू होणार आहे. या रस्त्याच्या कामाला तांत्रिक मंजुरी मिळाल्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
----------------
बियाणे बॅंकेचे आज नेरुरला उद्‍घाटन
कुडाळ, ता. २९ ः जिल्हा भारतीय किसान संघाच्यावतीने उद्या (ता. ३०) सायंकाळी ३ ते ५ या वेळेत देशी बियाणे बँक उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या या देशी बियाणे बँकेचा उद्घाटन सोहळा नेरुर-शिरसोस शाळेजवळ सूर्यकांत कुंभार यांच्या घरी होणार आहे. यावेळी महाराष्ट्र प्रांत महामंत्री मदन देशपांडे, जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती तालुकाध्यक्ष जयराम परब यांनी दिली.
--
सावंतवाडी शहरात रंगला मेळावा
सावंतवाडी, ता. २९ ः येथील केशवसुत कट्टा सदस्यांचा स्नेहमेळावा नुकताच अतुल माईणकर यांच्या श्री महालक्ष्मी मंगल कार्यालय, सबनीसवाडा-सावंतवाडी येथे झाला. माईणकर यांनी उपस्थितांचे स्वागत, प्रियोळकर, नीलम जोशी आणि अतुल माईणकर यांनी आपल्या कवितांचे वाचन केले. श्री. प्रभू, डॉ. सोनारे, श्री. कात्रे आणि राजू डोंगरे यांनी गीतांचे सादरीकरण करून रंगत आणली. अ‍ॅड. अरुण पणदूरकर यांनी कवी मंगेश पाडगावकर यांची कविता सादर केली. प्रा. आबा सातवळेकर यांच्या पत्नी वसुधा सातवळेकर यांनी वेगवेगळ्या माणसांच्या चहा पिण्याच्या सवयीची नक्कल करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी सुमन माईणकर उपस्थित होत्या. अतुल माईणकर यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com