सर्वपक्षिय सहकार पॅनलचे 11 उमेदवार विजयी

सर्वपक्षिय सहकार पॅनलचे 11 उमेदवार विजयी

२६ (पान ५ साठीमेन)


- rat२९p१३.jpg-
९९४००
रत्नागिरी ः सर्वपक्षीय सहकार पॅनलचे विजयी उमेदवार.
-
सर्वपक्षीय सहकार पॅनलचे ११ उमेदवार विजयी

तीन अपक्षांचा पराभव ; ठाकरे-शिंदे गटाला प्रत्येकी ४, भाजपा, काँग्रेसला प्रत्येकी २, राष्ट्रवादीला ५ जागा

रत्नागिरी, ता. २९ : रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणूकीत सर्वपक्षिय सहकार पॅनलने सर्वच्या सर्व जागांवर निर्विवाद यश संपादन केले. तीन उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. तीन अपक्ष उमेदवारांचा पराभव झाला आहे. रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ११ जागांसाठी १४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

शुक्रवारी (ता. २८) ११ हजार ११० मतदानापैकी ३ हजार ४१५ म्हणजे एकूण ३२.३७ टक्के मतदान झाले होते. आज सकाळी रत्नागिरीत मतमोजणी झाली. निवडणूक निर्णय अधिकारी रोहिदास बांगर यांनी काम पाहिले. सहकार पॅनेलमधून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, ठाकरे सेना असे सर्वच पक्ष एकत्र आले होते. मात्र, तीन अपक्ष उमेदवारांमुळे निवडणूक झाली. यामध्ये सहकार पॅनेलचे हेमचंद्र माने (भाजप), गजानन पाटील (शिंदे सेना), सुरेश कांबळे (राष्ट्रवादी) हे तीन संचालक आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. ११ जागांसाठी झालेल्या निवडणूक निकालात अरविंद आंब्रे (१२८५, राष्ट्रवादी) विजय टाकळे (१२८२, राष्ट्रवादी), मधुकर दळवी (१२७६, शिंदे सेना), नैनेश नारकर (१२८१, ठाकरे सेना), रोहित मयेकर (१२७०, शिंदे सेना), सुरेश सावंत (१२९५, राष्ट्रवादी), संदीप सुर्वे (१२१२, ठाकरे सेना), स्मिता दळवी (१४२६, राष्ट्रवादी), स्नेहल बाईत (१४०७, ठाकरे सेना), ओंकार कोलगे (१६५७, शिंदे सेना), प्रशांत शिंदे (१६४६, ठाकरे सेना) उमेदवार विजयी झाले आहेत. सहकार पॅनेलमधून ठाकरे सेना, शिंदे गट यांना प्रत्येकी ४, भाजपा, काँग्रेसला प्रत्येकी २, राष्ट्रवादीला ५ जागा देण्यात आल्या आहेत.
एकूण १७ जागांसाठी झालेल्या बाजारसमितीच्या निवडणुकीत तीन जागा बिनविरोध, तर ११ जागांवर प्रत्यक्ष निवडणुकीने संचालक निवडून आले. उर्वरित तीन जागा उमेदवारी अर्ज नसल्याने रिक्त राहिल्या आहेत.
-
कोट
बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न होते. मात्र काही ठिकाणी तडजोड होऊ शकलेली नाही. त्यामुळे निवडणुकीला सामोरे जावे लागले. अपेक्षेप्रमाणेच सर्वपक्षीय सहकार पॅनेल विजयी झाले.
- बाबाजी जाधव, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
-----
कोट
सहकारात राजकारण नको या उद्देशाने उद्धव ठाकरे शिवसेनेकडून सर्वपक्षीय सहकार पॅनेलमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अपेक्षेप्रमाणे पॅनेलच्या सर्व जागा निवडून आलेल्या आहेत.
-संदीप सुर्वे, संचालक, ठाकरे शिवसेना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com