नगरसेवक रोहन खेडेकरांना दिलासा

नगरसेवक रोहन खेडेकरांना दिलासा

99412 - रोहन खेडेकर

नगरसेवक खेडेकरांना दिलासा
अपात्रतेचा आदेश रद्द; उच्च न्यायालयात निर्णय

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २९ ः देवगड जामसंडेचे नगरसेवक रोहन खेडेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. नगरपंचायत अधिनियमाचा भंग करून विनापरवाना इमारत बांधकाम केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकाऱ्‍यांनी त्यांना नगरसेवक पदावरून अपात्र ठरविले होते. याविरुद्ध खेडेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेथे हा आदेश मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आला. ही माहिती ठाकरे गटाचे नगरसेवक निवृत्ती ऊर्फ बुवा तारी यांनी दिली.
नगरपंचायत अधिनियमाचा भंग करून विनापरवाना इमारत बांधकाम केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकाऱ्‍यांनी देवगड-जामसंडे नगरपंचायत प्रभाग सातचे नगरसेवक खेडेकर यांना नगरसेवक पदावरून अपात्र ठरविले होते. याबाबत भाजपचे माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांनी जिल्हाधिकाऱ्‍यांकडे अर्ज केला होता. त्यावर सुनावणी झाली होती. त्यानुसार खेडेकर यांनी नगरसेवक पदावर असताना विनापरवाना बांधकाम केल्याचा ठपका ठेवून त्यांना नगरसेवक पदावरून अपात्र ठरविले होते. खेडेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयात २५ ला झालेल्या सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश रद्दबातल ठरविताना खेडेकर यांच्या प्रकरणाची फेरसुनावणी घेण्याचे आदेशही दिले आहेत. त्यामुळे त्यांना या प्रकरणातून तूर्त दिलासा मिळाला आहे. खेडेकर यांच्यातर्फे अ‍ॅड. नरेंद्र वालावलकर आणि अ‍ॅड. सुरेश सबरत यांनी युक्तिवाद केला, अशी माहिती श्री. तारी यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com