देवगडमध्ये तीन ठिकाणी
१८ हजाराची दारू जप्त

देवगडमध्ये तीन ठिकाणी १८ हजाराची दारू जप्त

देवगडमध्ये तीन ठिकाणी
१८ हजाराची दारू जप्त

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २९ ः तालुक्यात विविध तीन ठिकाणी पोलिसांनी सुमारे १८ हजार ५० रुपये किंमतीची गोवा बनावटीची अवैध दारू पकडली. ओरोस येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने दोन ठिकाणी, तर येथील पोलिसांनी एका ठिकाणी ही कारवाई केली.
याबाबत पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओरोस येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने आज दुपारी सव्वाच्या सुमारास मिठबाव येथे सुमारे १० हजार ९०० रुपयांची गोवा बनावटीची दारू पकडली. यामध्ये मिठबाव येथीलच एका तरुणावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. तर दुपारी अडीचच्या सुमारास कोटकामते परिसरात सुमारे ६ हजार ४०० रुपयांची गोवा बनावटीची दारू पकडून एका संशयितावर कारवाई करण्यात आली. दोन्ही मिळून सुमारे १७ हजार ३०० रुपयांची दारू स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने पकडली. तर येथील पोलिसांनी गुरुवारी (ता. २८) रात्री आठच्या सुमारास येथील खाडीकिनारी सुमारे ७५० रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारू पकडली. यामध्ये एका वृद्धावर कारवाईचा बडगा उगारल्याची माहिती श्री. बगळे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com