इतिहासाचा आरंभबिंदू रत्नागिरी असू शकतो

इतिहासाचा आरंभबिंदू रत्नागिरी असू शकतो

rat३०p३०.jpg-
९९५९८
कातळशिल्प
-rat३०p२९.jpg-
९९५९७
अखिलेश झा
--------------
कातळशिल्पांमुळे इतिहासाचा आरंभबिंदू रत्नागिरी
ग्रामीण विकास मंत्रालयाचे मुख्य लेखापाल अखिलेश झा; युनेस्कोच्या वारसास्थळात समावेश
रत्नागिरी, ता. ३० : कातळशिल्प हा कोकणचा कदाचित सर्वाधिक मोठा ठेवा आहे. हा शब्द कोकणवासियांसकट साऱ्यांनी गांभिर्याने घेतला पाहिजे. तो मराठी आहे म्हणून नव्हे तर या कातळशिल्पांसाठी इतका दुसरा चांगला शब्द असू शकत नाही. इतिहासात प्रत्येकाने मोहेंजोदडो, हडप्पा, सिंधुसंस्कृती याबद्दल शिकले असेल. परंतु येत्या दोन वर्षांत शाळा, महाविद्यालये आणि पदव्युत्तर शिक्षणात कातळशिल्पांचा सहभाग असेल. मी फार दूरचा उल्लेख करत नाही दोन वर्षांतच आपला इतिहास कातळशिल्पांमुळे रत्नागिरीतून सुरू होईल, असा दावा केंद्रीय पंचायतराज आणि ग्रामीण विकास मंत्रालयाचे मुख्य लेखापाल अखिलेश झा यांनी केला.
युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या प्राथमिक यादीत कोकणातील कातळशिल्पांचे नाव जाहीर झाले आहे. त्यासंबंधी निसर्गयात्री संस्थेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाकरिता आलेल्या झा यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, भारताइतके प्राचीन दस्तावेजीकरण इतर कोठेही जगात झालेले नाही. आपले ऋषी उत्तम दस्तावेज बनवत, वेदांची सुक्ते वेगवेगळी आहेत त्यात कोणत्या ऋषीने कोणती सुक्ते रचली याचा उल्लेख आहे. एवढेच नव्हे प्रत्येक सूक्त कोणत्या छंदात व कोणत्या मीटरमध्ये आहे याचाही उल्लेख आहे. दस्तावेज बनवण्याचे इतके चांगले उदाहरण इतरत्र नाही. मात्र आपण आत्मसन्मानाच्या मागे न लागता विश्वगुरु बनण्याऐवजी विश्वातील सर्वोत्तम छात्र बनणे आवश्यक आहे. तसे बनून कातळशिल्प गांभिर्याने घेतले पाहिजे. कातळशिल्पांमुळे इतिहास रत्नागिरीतून सुरू झाला तर ते सर्वात मोठे यश असेल. कातळशिल्पांमुळे आर्थिक भरभराट, पर्यटनवाढ यापलिकडे ही महत्त्वाची गोष्ट आहे हे ध्यानी घ्या.
झा म्हणाले की, आणखी दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कातळशिल्पांच्या नोंदी करताना अनेक बाबींचा अभ्यास होणार आहे. आपल्याला त्या बाबींच्या नोंदीही करायच्या आहेत. कातळशिल्प ते आजचा काळ या दरम्यान अनेक गोष्टी अस्तंगत झाल्या आहेत. काही जीवजंतू नाहीत. हे वातावरण बदलाने घडले आहे. वातावरण बदल ही अत्यंत वास्तव बाब आहे आणि याचा अभ्यास होणारी रत्नागिरी ही सर्वांत मोठी प्रयोगशाळा यामुळे ठरेल, हे ध्यानी घ्या. कातळशिल्पांच्या अभ्यासामध्ये याचा अभ्यासही होणार आहे.

चौकट
स्थानिक लोकांकडून सहकार्याची अपेक्षा
आणखी एक बाब म्हणजे आजवर पुरातत्त्व खात्याच्या कामात लष्कराचे लोक होते. मात्र शास्त्र विभागाचे, शास्त्र व तंत्रज्ञानाचे तज्ज्ञ अपवादानेच होते. येथे मद्रास, हैद्राबाद आयआयटी, सायन्स अॅंड टेक्नॉलॉजी विभागाचे वरिष्ठ संशोधक, तंत्रज्ञ वारंवार कोकणात येऊन काम करणार आहेत. येथील विद्यार्थ्यांशी, लोकांशी संवाद साधणार आहेत. यामुळे केवढे मोठे बौद्धिक परिवर्तन होणार आहे, याचा अंदाजही लागणे कठीण आहे. मात्र याचे महत्त्व ध्यानी घेऊन इथल्या स्थानिक लोकांकडून सहकार्याची अपेक्षा झा यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com