श्री समर्थ ज्ञानसंस्कार शिबिराला प्रतिसाद

श्री समर्थ ज्ञानसंस्कार शिबिराला प्रतिसाद

२८ (टुडे पान ३ साठी)

-rat२p१४.jpg-
९९९२२
रत्नागिरी : केळ्ये आंबेकोंड येथील श्रीरामकृष्ण आनंदवन येथे आयोजनत श्री समर्थ ज्ञानसंस्कार शिबिरात अभ्यास करताना विद्यार्थी-विद्यार्थिनी.
--

श्री समर्थ ज्ञानसंस्कार शिबिराला प्रतिसाद

दासबोध पारायण ; केळ्ये येथील आनंदवनात प्रथमच आयोजन

रत्नागिरी, ता. २ : आद्य श्री शंकराचार्य जयंतीनिमित्त केळ्ये- आंबेकोड येथील श्रीरामकृष्ण आनंदवन येथे श्री समर्थ सेवा मंडळ (सज्जनगड) यांच्या संयुक्त विद्यमाने सात दिवसाचे श्री समर्थ ज्ञानसंस्कार शिबिर आयोजित केले होते. सद्गुरु नगरनिवासी प. पू. श्रीरामकृष्ण सरस्वती स्वामींच्या आशिर्वादाने डॉ. बापट व कुटुंबीयांनी याचे प्रथमच आयोजन केले.
या शिबीरात ९ ते १४ वर्षे वयोगटातील ९० विद्यार्थी- विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. सांगली, सातारा, ठाणे, पुणे, मुंबई, मुंबईतील उपनगरे या विविध शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच रत्नागिरीमधील फाटक हायस्कूल, शिर्के हायस्कूल, पटवर्धन हायस्कूल, जीजीपीएस शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले. तसेच २५ पालक दासबोध पारायणासाठी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये सर्व पालकांसाठी दासबोध पारायण, व्याख्याने आयोजित केली होती. विद्यार्थ्यांसाठी संस्कार वर्ग, योगासने, व्यायाम, पारंपरिक खेळ, संतचरित्र, कथाकथन असे भरगच्च कार्यक्रम आयोजित केले होते. ज्या प्रकारे सज्जनगडावर शिबिर आयोजित होते त्याचप्रमाणे हे शिबीर रत्नागिरी येथील आनंदवनात उत्कृष्टपणे झाले. श्री समर्थ ज्ञानसंस्कार शिबिराची सर्व धुरा श्री समर्थ सेवा मंडळ (सज्जनगड) येथील मुख्य कार्यवाह रामदासी योगेश बुवा रामदासी, अजय बुवा रामदासी, वैशंपायन बुवा यांनी समर्थपणे सांभाळली.
निवास, अल्पोपहार व भोजन व्यवस्था सर्व जबाबदारी ही श्रीरामकृष्ण आनंदवनचे मालक डॉ. गिरीश बापट व पूजा बापट आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी मिळून उत्तमरीत्या पार पाडली. उत्कृष्ट या शिबिरामध्ये प्रातःस्मरण स्तोत्र, सूर्यनमस्कार योगासने, सुभाषिते, संत चरित्रे, मनाचे श्लोक, भगवद्गीता, कथाकथन, खेळ, सायं उपासना, वाल्मिकी रामायण असा दिनक्रम होता.
--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com