‘मळेवाड’च्या विकासासाठी कटिबद्ध

‘मळेवाड’च्या विकासासाठी कटिबद्ध

99943
मळेवाड ः महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचे उद्‍घाटन करताना शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी. सोबत मान्यवर. (छायाचित्र ः धनश्री मराठे)

‘मळेवाड’च्या विकासासाठी कटिबद्ध

अशोक दळवी; सांस्कृतिक पर्यटन महोत्सवाचे उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
मळेवाड, ता. २ ः महोत्सवाच्या माध्यमातून गावात सांस्कृतिक चळवळ सुरू ठेवण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. सांस्कृतिक उपक्रमांसह समाजाभिमुख उपक्रमांतून गावाच्या विकासात युवकांनी योगदान द्यावे. यासाठी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध करून देऊ. मळेवाड गावाच्या विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत, असे आश्वासन शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी दिले.
मळेवाड सांस्कृतिक पर्यटन महोत्सव २०२३ च्या पहिल्या दिवसाचे उद्‍घाटन रविवारी शिवसेना जिल्हाप्रमुख दळवी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. मळेवाड-जकातनाका येथे ग्रामपंचायत मळेवाड-कोंडुरे व युवा मित्रमंडळ मळेवाड-कोंडुरे यांच्यावतीने पाच दिवशीय सांस्कृतिक महोत्सव २०२३ चे आयोजन ३० एप्रिल ते ४ मे दरम्यान करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी श्री गणेशावर अभिषेक, श्रींची महापूजा व रात्री हेळेकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग आदी कार्यक्रम झाले. या सर्व कार्यक्रमांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशीचा प्रारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख दळवी यांच्या हस्ते तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ वाढवून झाला. यावेळी मनोगत व्यक्त करताना तालुकाप्रमुख बबन राणे यांनी मळेवाड गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. गावामध्ये पाच दिवसांचा महोत्सव भरवून सांस्कृतिक चळवळ सुरू ठेवल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुक केले. जिल्हाध्यक्ष दळवी यांनी महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा प्रारंभ करण्याचा मान दिल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. या प्रसंगी सरपंच मिलन पार्सेकर, ग्रामपंचायत सदस्य कविता शेगडे, अमोल नाईक, मधुकर जाधव, सानिका शेवडे, रिक्षा चालक-मालक संघटना अध्यक्ष गुरुप्रसाद नाईक, मळेवाड जकातनाका व्यापारी संघटना अध्यक्ष पांडुरंग गावडे, माजी पंचायत समिती सदस्य बाळा शिरसाट उपस्थित होते. उपसरपंच हेमंत मराठे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com