पूर्वजांचा इतिहास वाचला नाहीत तर वाचणार नाही

पूर्वजांचा इतिहास वाचला नाहीत तर वाचणार नाही

पूर्वजांचा इतिहास वाचला नाही
तो संघर्षात वाचणार नाहीः भिडे
रत्नागिरी, ता. २ः हिंदुस्तान हा जगातील सर्वांत संपन्न देश आहे. सर्वांत मोठी नदी, सुपीक जमीन, कस्तुरी देणारे हरण, सर्वात उंच पर्वत हे सर्व आपल्या हिंदुस्थानात आहे. तिन्ही ऋतू केवळ हिंदुस्थानातच आहेत. जगात सर्वात जास्त आक्रमणे केवळ हिंदुस्थानावर झाली; पण हिंदुस्थानामध्ये कधीही सुडाची भावना नव्हती. ज्यांनी ज्यांनी आक्रमणे केली त्यांनी येथीलच सैन्य वापरले होते, ही वस्तुस्थिती आहे. जो देश, जो समाज आपल्या पूर्वजांचा इतिहास वाचत नाही तो विश्वाच्या संघर्षात वाचणार नाही, असे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी येथे केले.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे टीआरपी येथील पाटीदार भवन येथे आयोजित प्रवचनात भिडे बोलत होते. त्यांनी आपल्या प्रवचनात हिंदुस्थानावर यापूर्वी झालेल्या आक्रमणांचा इतिहास उपस्थित श्रोत्यांसमोर मांडला. आक्रमण करणारे ब्रिटिश कशा पद्धतीने भारतात आले. त्यांनी इथे वास्तव्य केले, व्यापार केला. येथील जागा विकत घेतल्या आणि त्यानंतर सत्तेमध्ये सहभागी झाले आणि देश काबीज केला. यासाठी त्यांनी जे सैन्य वापरले ते सैन्यसुद्धा महाराष्ट्रातून घेतले गेले हा इतिहास प्रत्येक भारतीयाला माहित असणे आवश्यक आहे, असेही भिडे यांनी सांगितले.
ते म्हणाले, संस्कृत भाषा जगातील अनेक भाषांचे उगमस्थान आहे. अनेक भाषा संस्कृत भाषेतूनच निर्माण झाल्या आहेत. जगाने मान्य केलेल्या २४६ भाषा आहेत; परंतु यांची निर्मिती संस्कृतमधूनच झालेली आहे. जगात १२ महानद्या आहेत. त्यातील ७ महानद्या केवळ आपल्या भारतात आहेत. या नद्यांमुळेच आपला हिंदुस्तान सुजलाम् सुफलाम् व सुपीक आहे. हिंदुस्थानाची वैशिष्ट्ये अनेक आहेत की जी इतर देशांमध्ये नाहीत. जगातील अनेक देशांमध्ये हरणे आहेत; परंतु कस्तुरी देणारी हरणाची जात केवळ हिंदुस्थानामध्ये आहे. ज्या हिंदुस्थानामध्ये सर्व प्रकारचे धातू सापडतात, उंच पर्वत आहेत, कसदार जमीन आहे या सर्व गोष्टींचा आपल्याला अभिमान असणे गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com