पर्यटन, पर्यावरण संतुलनासह औद्योगिक विकास

पर्यटन, पर्यावरण संतुलनासह औद्योगिक विकास

३१ (टुडे पान २ साठी मेन)


-rat२p२७.jpg-
९९९४७
रत्नागिरी : महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्राप्त पोलिसांसमवेत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी.
--
पर्यटन, पर्यावरण संवर्धनासह औद्योगिक विकास

जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह ; महाराष्ट्र दिनी शासकीय ध्वजवंदन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : जिल्ह्यात कृषी, मत्स्य व्यवसाय तसेच पर्यटन यांच्या विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे. एका बाजूला पर्यावरण संवर्धन आणि दुसरीकडे जिल्ह्याचा औद्योगिक विकास असे संतुलन साधत आपणही जिल्ह्याचा विकास साधत आहोत. विकास हा शाश्वत असावा आणि जिल्हा प्रगत व्हावा, यासाठी प्रशासन व शासन कटीबध्द आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले.
पोलिस कवायत मैदानावर १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहणाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, विविध शासकीय विभागांचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, रत्नागिरी जिल्हा सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात विकासाला गती देण्यासाठी गेल्‍या आर्थिक वर्षात नियोजन समितीच्या माध्यमातून २७१ कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले होते. हा निधी १०० टक्के खर्च केला आहे. जिल्ह्याचा विकास पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे नेत आहोत.
शासनाच्या विविध योजनांची माहिती व लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी व कमीत कमी कालावधीत मिळण्याच्या दृष्टीने तसेच शासकीय योजना लोकाभिमुख करून त्याची गतिमान अंमलबजावणी करण्यासाठी १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत जत्रा शासकीय योजनांची- सर्वसामान्यांच्या विकासाची हे अभियान राबविण्यात येत आहे. नागरिकांनीही या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सिंह यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान पोलिस अधिकारी, अंमलदार यांना प्रशंसनीय सेवेबद्दल पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे जेंडर सेन्सिटिव्ह रूट मॉडेल म्हणून तालुका पातळीवर नामनिर्देशितांचा सत्कार केला. त्याचप्रमाणे शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेशही देण्यात आले.
----------
जिल्हाधिकारी यांनी नमुद केलेले मुद्दे

* महत्वाच्या ११ नद्यांचा गाळ काढण्याचे काम सुरू
* ५ लाख १४ हजार ९१२ घ.मी. गाळ काढला
* पर्यटन विकास योजनेतून १६ कोटी १२ लाखांच्या कामांना मंजुरी
* काजू बोर्डाची स्थापना
* खासगी रोपवाटिका स्थापना व बळकटीकरण
------------

११० गावे हर घर जल म्हणून घोषित
जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील १ हजार ४९६ गावात १ हजार ३५३ पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत असून या माध्यमातून जिल्ह्यातील ११० गावे ‘‘हर घर जल’’ म्हणून घोषित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com