सदर-टेक्नो

सदर-टेक्नो

३४ (टुडे पान ३ साठी)

(२५ एप्रिल टुडे तीन)

टेक्नो ...........लोगो


-rat२p२९.jpg ः
९९९५५
संतोष गोणबरे
---

लेसर उपयुक्त आहे

नव्वदीच्या दशकात पडद्यावर हिरो-हिरोईन नाचत असताना एखादा आगाऊ प्रेक्षक त्यांच्या बरोबरीने लाल ठिपक्याचा लेसर पॉईंट नाचवायचा तेव्हा गंमत वाटायची. आता विविधरंगी लेसरची बीम्स एकत्र नाचवून ‘शो’ म्हणून दाखवली जातात. तेव्हाही पाहताना तशीच गंमत वाटायला लागते; मात्र पन्नाशीच्या दशकापासून सुरू झालेला हा एकरेषीय आणि एकरंगीय प्रकाशाचा खेळ सर्वाधिक माणसाळलेला तंत्राविष्कार आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. मित्रहो, लेसरवर अजूनही अनेकविध अंगांनी काम सुरू आहे आणि त्याचे उपयोग वाढतच जात आहेत. वाढता वाढता वाढत जाणारा हा अनैसर्गिक प्रकाश किरण एके दिवशी अवकाश पार करून थेट दुसऱ्या ग्रहावरून माहिती घेऊन परत आला तर त्याचेही आश्चर्य वाटायला नको.
एप्रिल १९१७ ला अल्बर्ट आईनस्टाईनचे ‘मेसर’ तंत्राविष्कार सांगणारे संशोधन प्रसिद्ध झाले आणि १९५१ मध्ये जोसेफ वेबरने त्यामध्ये स्टिम्युलेटेड इमिशन म्हणजे उत्तेजित उत्सर्जन हा प्रकार आणून मायक्रोवेव्हची शक्ती वाढवण्याची कल्पकता मांडली. १९६० ला थोडेर मैमॅन याने ह्युजेस प्रयोगशाळेत पहिला वापरण्याजोगा लेसर रूबी रॉडवर प्रक्षेपित केला. मित्रहो, लेसर एक असे उपकरण आहे जे ऑप्टिकल प्रवर्धन प्रक्रियेद्वारे सुसंगत प्रकाशाचा किरण उत्सर्जित करते. गॅस लेसर, फायबर लेसर, सॉलिड स्टेट लेसर, डाई लेसर, डायोड लेसर आणि एक्सायमर लेसर यांसह अनेक प्रकारचे लेसर सध्या उपयोगात आहेत. लेसर तरंगलांबी सामान्यतः इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमच्या अल्ट्राव्हायोलेट, दृश्यमान किंवा इन्फ्रारेड क्षेत्रांमध्ये ३८० ते ७४० नॅनोमीटर एवढी असते. लेसर लाईट तंत्रज्ञानामध्ये अनेक अद्वितीय आणि प्रमाणबद्ध गुणधर्म आहेत. त्याच्या ऑप्टिकल गुणधर्मांमध्ये सुसंगतता, एकरंगीपणा, विवर्तन आणि तेज यांचा समावेश आहे. लेसर एकावेळी एकच रंग प्रक्षेपित करत असल्याने त्याला मोनोक्रोमॅटिक म्हटले जाते. मोनोक्रोमॅटिसीटीची पातळी जितकी जास्त असेल तितकी कमी वारंवारता (फ्रिक्वेन्सी) लेसर उत्सर्जित करू शकतो. लेसर बीम कमीत कमी विखुरलेले असतात.
लेसर हे आपण दररोज वापरत असलेल्या अनेक व्यवहारांचे प्रमुख घटक आहेत. ब्ल्यू-रे आणि डीव्हीडी डिस्कवरील माहिती वाचण्यासाठी लेसर वापरला जातो. बार कोड स्कॅनर माहिती प्रक्रियेसाठी लेसरवर अवलंबून असतात. श्रेणी शोधणे, माहिती वाचन, बार कोड वाचन, शस्त्रक्रिया, होलोग्राफिक इमेजिंग, स्पेक्ट्रोस्कोपी, कटिंग, खोदकाम, ड्रिलिंग, चिन्हांकित करणे, पृष्ठभाग बदल इत्यादी अनेक उपयोग लेसरचे आहेत. लेसर प्रिंटरने तर छपाई तंत्रज्ञानात आमुलाग्र क्रांती घडवून आणली आहे. अत्याधुनिक सौंदर्यचिकित्सेमध्ये लेसर उपचारांचे महत्व खूप मोठे आहे. मित्रहो, लेसर टोनिंग या चिकित्सेमध्ये त्वचा नितळ आणि मुलायम होण्यासाठी ND YAG उपचारपद्धती वापरून त्वचेतील मेलेनिन रंगद्रव्ये विघटित करून त्यांना शरीराबाहेर काढण्याची प्रक्रिया होते. काहीजण या पद्धतीची भुरळ घालून तुम्हाला गोरे बनवतो, असेही सांगतात; पण इथे फक्त त्वचेतील छिद्रे मोकळी करून कॉलेजन नावाचे पांढऱ्या पेशींतील प्रथिने घटक अधिक उत्तेजित केले जातात. शरीराच्या कोणत्याही भागावरील नको असलेल्या केसांसाठी कायमस्वरूपी उपचार, तारुण्यपिटिका, जन्मखुणा, म्हसे, चामखीळ, वांग ते अगदी कधीकाळी प्रेमाने केलेले आणि आता नकोसे झालेले गोंदण मिटवण्यासाठी देखील वरील पद्धतीप्रमाणे लेसर उपचार करता येतो. काहीजण तर चक्क उतारवयातील सुरकुत्या घालवून तरुण होण्यासाठी लेसरचा वापर करून घेतात. प्रसूतीनंतरचे स्ट्रेच मार्कस्, अनावश्यक केस किंवा प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी देखील लेसर उपयुक्त आहे. वंध्यत्वावरील ट्युबोप्लास्टी ही छोटी शस्त्रक्रिया लेसरने केली जाते. रेटिनल लेसर फोटोकोएग्युलेशन आणि लॅसिक सर्जरी या डोळ्यांच्या रेटिनाशी संबंधित विविध विकारांवर उपचारपद्धती अनेक नेत्रतज्ञ सर्रास वापरतात.
मित्रहो, सध्या फ्री-इलेक्ट्रॉन्स लेसरवर जोरदार संशोधन चालू आहे. जर्मन, फ्रान्स आणि युरोपीय शास्त्रज्ञ बिजित दिवे किंवा पुंजीय प्रकाश निर्माण करण्यासाठी जोरदार मेहनत घेत आहेत. या प्रकल्पाला Seeded FEL असे नाव देण्यात आले असून, हे संशोधन पूर्ण झाल्यावर विद्युतक्षेत्रात अनेक क्रांतिकारी बदल घडून येणार आहेत. नवीन तरंगलांबी असलेला बॅन्ड, जास्तीची ऊर्जा, अधिकची वहनशक्ती आणि अतीउच्च कार्यक्षमता (इफिशिअन्सि) असलेला नवीन लेसर कमीतकमी कमी किमतीत बाजारात आल्यास संदेशवहनात बदल संभवतात. नुकतेच म्युनिच विद्यापीठाने २०० गिगाहर्टस् वारंवारतेचा (फिक्वेन्सी) लेसर प्रात्यक्षिक केल्याचे संशोधन जाहीर केले आहे. पुढील काळात लेसर किरण वापरून काही प्रकाशवर्ष दूर असलेल्या ग्रहावर संदेश पाठवून तेथील वातावरणाचा अभ्यास सुरू होईल तेव्हा यान पाठवणे किंवा सॅटेलाईट प्रक्षेपित करून माहिती मिळवण्याची आर्थिक दुविधा कमी होऊन विज्ञान अधिक वेगाने प्रगतीकडे झेपावेल, हे नक्की !

(लेखक महाविद्यालयाचे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आहेत.)

-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com