चिपळूण-दिशान्तरतर्फे 35 लाखाची शिष्यवृत्ती वाटप

चिपळूण-दिशान्तरतर्फे 35 लाखाची शिष्यवृत्ती वाटप

२२ (टुडे पान २ साठी)


-rat२p१७.jpg ः
९९९२५
चिपळूण ः दिशान्तरच्या शिष्यवृत्तीचे लाभार्थी.
-

दिशान्तरतर्फे ३५ लाखांची शिष्यवृत्ती वाटप

चिपळूण, ता. २ ः दिशान्तर संस्थेने ज्ञानयज्ञ प्रकल्पाच्या माध्यमातून मागील पाच वर्षात ३५ लाखाची शिष्यवृत्ती वाटली.
शिष्यवृत्तीमध्ये यावर्षी ८४ विद्यार्थ्यांना ३ लाख ४८ हजार ८०० रुपयांचे वितरण करण्यात आले. ही रक्कम विद्यार्थी किंवा संबंधित संस्था शाळेच्या खात्यात जमा केली जाते. त्यासाठी विहित नमुन्यात अर्ज तसेच इतर शैक्षणिक कागदपत्र शाळेचे पत्र आदींची पूर्तता करावी लागते. यानंतर पाठवलेल्या विद्यार्थी प्रस्तावातून निकषाअंती शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. यावर्षीचे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी हे चिपळूण, खेड, गुहागर व मंडणगड या तालुक्यातील आहेत.
माध्यमिक शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहराकडे जाणे, डोनेशन, रोजचा प्रवास व बाहेरगावी राहण्याचा खर्च अशा साऱ्यांमुळे अंगी गुणवत्ता असूनही उच्च शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना शिक्षणात अडथळे येतात. गावकुसापासून दूरवर राहणाऱ्यांना जंगलवाटा तुडवत शाळेत यावे लागते. शिक्षणासाठी चाललेली पायपीट प्रसंगी सहन होते. यात कुणाची आई नाही तर कुणाचे वडील नाहीत. कुणाचे दोघेही नाहीत तर दुसरीकडे आई-वडील आहेत; पण अल्प उत्पन्नामुळे केवळ पोट भरण्यापुरते साधन उपलब्ध. अशा कौटुंबिक निराधार व आर्थिक दुर्बल स्थितीतील प्रज्ञावंत युवाशक्तीला दिशान्तरने पाठबळ दिले आहे.
संस्थेच्या या प्रकल्पाचे तीन टप्पे आहेत. पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वह्या, पेन, कंपासपेटी, परीक्षा पॅड, खाऊचा डबा, पाणीबॉटल अशा शैक्षणिक साहित्यासह दप्तर देण्यात येते. कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कला-वाणिज्य-विज्ञान अशा तीन शाखेकरिता क्रमिक अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तकांची पेढी कॉलेजनिहाय उपलब्ध करून देण्यात आली आहे. २५ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. याच जोडीने काही विद्यार्थ्यांना एसटी पासेसदेखील देण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com