माडखोल शाळेतील विद्यार्थ्यांनी
घेतला ''स्टोन पेंटिंग''चा अनुभव

माडखोल शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला ''स्टोन पेंटिंग''चा अनुभव

00038
माडखोल ः येथील मुलांनी दगडांवर साकारलेली चित्रे.


माडखोल शाळेतील विद्यार्थ्यांनी
घेतला ‘स्टोन पेंटिंग’चा अनुभव
सावंतवाडी ः माडखोल येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी तेथील नदीतील दगड,गोळा करून त्यांच्यावर रंग दिला. या निमित्ताने स्टोन पेंटिंग करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीने पुढाकार घेतला.
माडखोल क्रमांक २ धवडकी शाळा आयएसओ मानांकित असून महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने कार्यानुभव विषयाच्या अनुषंगाने स्टोन पेंटिंग कार्यशाळा आयोजित करण्यात आली. शाळेच्या समोरील नदीतील दगड आणून त्यांना सुरुवातीला पांढरा रंग देतात आला. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उदय राऊत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि प्रात्यक्षिक दाखवले. या उपक्रमात शाळेच्या १ ली ते ७ वी च्या ६५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शाळेचे उपक्रमशील व आदर्श कला शिक्षक अरविंद सरनोबत यांनी या उपक्रमाचे आयोजन नियोजन केले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती भावना गावडे यांनी मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग दाखवीला. माडखोल शाळेला लागूनच नदी असल्यामुळे दगडांचे काय करता येईल, यावरून ही कल्पना सुचली. शिवाय आमच्या शाळेचे अध्यक्ष उत्कृष्ट पेंटर आहेत. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून घ्यावा, असे वाटले. शिवाय रोजच्या पेक्षा वेगळ कायतरी करायचे आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्यगुणांना वाव देण्यासाठी शिक्षक अरविंद सरनोबत व सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला.
---
00033
श्री काळंबा देवी

डिगसमध्ये आजपासून विविध कार्यक्रम
कुडाळ ः डिगस येथील श्री काळंबा देवीचा वर्धापन दिन सोहळा उद्यापासून (ता. ३) ५ मेपर्यंत या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. श्री काळंबा मंदिरात उद्या सकाळी ७ वाजता देवीची विधीवत पूजा, ९ वाजता श्री लिंगेश्वर मंदिर अभिषेक, १० वाजता श्री काळंबा (कालिका) मंदिर अभिषेक, सायंकाळी ६ वाजता हरिपाठ, रात्री ८ वाजता सदाशिव पाटील (कापडोस आंदुर्ले) यांचे कीर्तन, रात्री ११ वाजता अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ (म्हापण वेंगुर्ले) यांचा ‘कुर्मदासाची वारी’ नाट्यप्रयोग, गुरुवारी सकाळी ७ वाजता श्री काळंबा देवीची विधीवत पूजा, ८.३० वाजता अभिषेक, देवीसुक्त, होमहवन, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता हरिपाठ, ७.३० वाजता रामकृष्ण हरी महिला भजन संघ (भोम-तेंडोली) बुवा जुई राऊळ यांचे भजन, रात्री ८.३० वाजता स्थानिक भजने, रात्री १० वाजता श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज दशावतार नाट्यमंडळ, नेरुर यांचा ट्रिकसिनयुक्त नाट्यप्रयोग ''गर्वपरिहार'', शुक्रवारी सकाळी ७ वाजता श्री काळंबा देवीची विधीवत पूजा, ८ वाजता पाद्यपूजा व अभिषेक, ९ वाजता श्रींची महापूजा, ११ वाजता महाआरती व महानैवेद्य, दुपारी १२ वाजता वारकरी दिंडी, १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता हरिपाठ, ७.३० वाजता स्थानिक भजने, रात्री १०.३० वाजता सुगम संगीत (गणेश मेस्त्री व सहकारी), १२ वाजता बोर्डेकर दशावतार नाट्यमंडळ, दोडामार्ग यांचे नाटक आदी कार्यक्रम होणार आहेत. नेहमीप्रमाणे ओटी भरणे, नवस बोलणे व फेडणे कार्यक्रम सुरू राहणार आहेत.
---
00053
श्री देव आवळेश्वर मंदिर

आवळेश्वर मंदिरात आज धार्मिक कार्यक्रम
तळेरे ः कासार्डे-तांबळवाडी येथील श्री आवळेश्वर देवस्थान येथे उद्या (ता.३) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यावेळी श्री सत्यनारायण महापूजा तसेच, विविध कार्यक्रम होणार आहेत. सकाळी ९ वाजता अभिषेक, सत्यनारायण महापूजा व तिर्थप्रसाद, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, ३ ते ५ वाजता महिलांसाठी हळदीकुंकू, संध्याकाळी ५ ते ८ स्थानिक भजने आणि रात्री ९ नंतर आमनेसामने तिरंगी भजनांचा जंगी सामना रंगणार आहे. आजिवली-सोनारवाडी (ता.राजापूर) येथील बुवा प्रविण सुतार, नाडण (ता.देवगड) येथील बुवा संदिप पुजारे आणि बुवा मुंबई भांडुप येथील बुवा सुशिल गोठणकर यांच्यात तिरंगी सामना रंगणार आहेत. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आवळेश्वर देवस्थान कासार्डे तांबळवाडी यांनी केले आहे.
---------
कोलगाव शाळेचे यश
सावंतवाडी ः युवा संदेश प्रतिष्ठानतर्फे घेण्यात आलेल्या एसटीएस अर्थात सिंधुरत्न टॅलेन्ट सर्च परीक्षेत कोलगाव जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. दुसरीतील योजित करमळकर (१३६ गुण, जि. प. पू. प्रा. शाळा नं.३) या विद्यार्थ्याने या परीक्षेत रौप्यपदक प्राप्त केले. निधी राऊळ दुसरी (१२० गुण, जि. प. पू. प्रा शाळा नं.२) हिने कांस्यपदक पटकविले. अरफ शेख, आयुष घाटकर, वैष्णवी धुरी, कृतिका सुतार या विद्यार्थ्यांनीही चांगले गुण मिळविले. या सर्व विद्यार्थ्यांना सौ. स्वरा सागर चव्हाण यांचे मागदर्शन लाभले. सौ. चव्हाण यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com