दाभोळ ः दापोली समर सायक्लॉथॉनमध्ये 350 स्पर्धकांचा सहभाग

दाभोळ ः दापोली समर सायक्लॉथॉनमध्ये 350 स्पर्धकांचा सहभाग

rat२p३८.jpg
०००१७
दाभोळः समर सायक्लॉथॉनमधील विजेते.
----------------
दापोली समर सायक्लॉथॉनमध्ये ३५० स्पर्धकांचा सहभाग
उत्स्फूर्त प्रतिसाद ; हनुमान, श्रुष्टी, बाळू, ओंकार ठरले विजेते
दाभोळ, ता. २ ः सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे आयोजित दापोली समर सायक्लोथॉन २०२३, सिझन ३ सायकल स्पर्धा ३० एप्रिलला उत्साहात पार पडली. यामध्ये महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील, वय ६ ते ७२ वयोगटातील ३५० स्पर्धक सहभागी झाले होते. दापोली सालदुरे, हर्णै, आंजर्ले, पाडले, आडे, उटंबर या समुद्रकिनाऱ्यावरील मार्गावरून कोकणातील निसर्गसौंदर्य अनुभवत सर्वांनी सायकल चालवली.
यामध्ये दापोली-पाळंदे-दापोली २० किमी मार्गावर अटीतटीची सायकल रेस स्पर्धा झाली. खुला गट सायकल स्पर्धा गटात हनुमान चोपडे (पुणे), प्रणव कांबळे (पुणे), सिद्धेश पाटील (कोल्हापूर), हेमंत लोहार (कोल्हापूर), हर्ष पवार (पनवेल) हे विजेते ठरले. त्यांना रु. ११ हजार १११, ७ हजार ७७७, ५ हजार ५५५, ३ हजार ३३३, १ हजार १११, चषक, मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. महिला गटात श्रुष्टी कुंभोजे (हातकणंगले कोल्हापूर), श्रावणी घोडेस्वार (हातकणंगले कोल्हापूर), आदिती शिंदे (पुणे), सिंगल गिअर गटात बाळू हिरेमठ (इचलकरंजी), विलास वाघमारे (अलिबाग रायगड), विनायक सूर्यवंशी (पळूस सांगली) आणि एमटीबी गटात ओंकार खेडेकर (पुणे), हर्षद पाटील (कोल्हापूर), संभाजी मोहिते (नगर) हे विजेते ठरले तसेच प्रवीणकुमार कुलथे (ठाणे, वय ७२), गजानन भातडे (रत्नागिरी, ७२), रचना लागू (ठाणे, ६७), आर्यन लोहार (पळूस सांगली, १२), ग्रिष्मा चव्हाण (दापोली, ११) यांना विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले तर लकी ड्रॉ बक्षिसातील सायकल साईप्रसाद वराडकर याने जिंकली.
सायक्लोथॉनसाठी प्रमुख अतिथी नीलिमा देशमुख, दापोली पोलिस निरीक्षक विवेक आयरे, दापोली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किशोर जाधव, श्री. सायकल मार्टचे मंदार बाळ, आंजर्ले सरपंच मंगेश महाडिक आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com