शाळा पूर्वतयारी मेळावा
शिडवणे येथे उत्साहात

शाळा पूर्वतयारी मेळावा शिडवणे येथे उत्साहात

०००५४

शाळा पूर्वतयारी मेळावा
शिडवणे येथे उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २ : जिल्हा परिषद शाळांमध्ये मुलांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, शालेय पोषण आहार अशा विविध शासकीय योजना राबविल्या जातात. सर्वांगीण विकासाचे धडे दिले जातात. त्यामुळे पालकांनी मुलांना जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकवावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य रवींद्र जठार यांनी शिडवणे नं. १ शाळेच्या शाळा पूर्वतयारी मेळाव्यात केले.
मेळाव्याचे उद्धाटन शारदामाता पूजन व दीपप्रज्वलनाने उदघाटन करण्यात आले. शिडवणे उपसरपंच दीपक पाटणकर, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी विजय टक्के यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या. सातवीच्या मुलांना ग्रंथभेट देऊन निरोप देण्यात आला. यानिमित्त शैक्षणिक स्टॉल्स मांडण्यात आले. पहिलीत प्रवेश घेणाऱ्या मुलांचे वाजतगाजत स्वागत केले. पहिलीच्या मुलांना पुस्तक वितरण करून त्यांच्या पायांचे ठसे घेण्यात आले. सूत्रसंचालन प्रवीण कुबल यांनी, आभार मुख्याध्यापक सुनिल तांबे यांनी मानले. ग्रामपंचायत सदस्य शांताराम धुमाळ, सुप्रिया पांचाळ, स्मिता टक्के, शाळा समिती अध्यक्ष महेंद्र धुमाळ, अनिल पांचाळ, सदाशिव कुडतरकर, प्रवीण पाटणकर, रामचंद्र पाटणकर, सचिन टक्के, शिक्षिका सुजाता कुडतरकर, सीमा वरुणकर, माता पालक श्रद्धा पाळेकर, अर्चना पाष्टे, मानसी रांबाडे, आरती शिंदे, कोमल वारिसे आदींसह पहिलीत प्रवेश घेणारे शर्वरी, सार्थक, तन्मय, आर्या, विधी, जान्हवी आदी विद्यार्थी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com