कोल्हापूरचे दिंडे, पवारांची रिक्षा ठरली सुंदर

कोल्हापूरचे दिंडे, पवारांची रिक्षा ठरली सुंदर

rat२p३३.jpg-
९९९७५
रत्नागिरी ः सुंदरी स्पर्धेत सहभागी रिक्षा.
- rat२p३४.jpg-
९९९७६
रत्नागिरी ः दोन चाकावर रिक्षा चालवण्याचा थरार
-------------
कोल्हापूरचे दिंडे, पवारांची रिक्षा ठरली सुंदर
रिक्षा सुंदरी स्पर्धा ; संगमेश्‍वरचा समीर बोले द्वितीय
रत्नागिरी, ता. १ः श्री स्वराज्य प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या रिक्षा सुंदरी स्पर्धेचे विजेतेपद कोल्हापूरच्या अविनाश दिंडे आणि संकेत पवार यांनी पटकावले. तर २०१९ ते २३ या गटात सहभागी संगमेश्‍वरच्या समीर बोलेने द्वितीय आणि दापोलीच्या प्रसाद दुर्गावळेने तृतीय क्रमांक मिळवला. रत्नागिरीसह सहा जिल्ह्यातील रिक्षा चालकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
रत्नागिरीतील मारुती मंदिर सर्कल येथील हॉटेल वायंगणकर शेजारी असलेल्या पार्किंगमध्ये रविवारी (ता. ३०) २०१९ ते २०२३ आणि २०१९ पूर्वीच्या अशा दोन गटात रिक्षा सौदर्य स्पर्धा घेण्यात आली होती. श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुषार साळवी यांनी याचे आयोजन केले होते. यामध्ये कोल्हापूर, निपाणी, मुंबई, पुणे, रायगड जिल्ह्यातील २५ जणांनी सहभाग घेतला होता. कराड येथून आलेल्या संग्राम शिंदे या तरुणाने रिक्षाच्या टपावर रायगड किल्ल्याची तर एका रिक्षा चालकाने पन्हाळगडची प्रतिकृती साकारलेली होती. सजवलेल्या आकर्षक रिक्षा पाहण्यासाठी आलेले रत्नागिरीकर सेल्फी घेण्यासाठी सरसावत होते. पालकमंत्री उदय सामंत, उद्योजक किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुषार सावळी, बाबय भाटकर यांच्या संकल्पनेतून झाली. या स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक अण्णा सामंत, शिवसेनेचे शहरप्रमुख बिपिन बंदरकर, बबलू कोतवडेकर, निमेश नायर, दिपक पवार, दिशा साळवी, बाळू साळवी उपस्थित होते. यावेळी रत्नागिरीतील ज्येष्ठ रिक्षा चालकांचा सन्मान करण्यात आला.
या स्पर्धेचा निकाल असाः अविनाश दिंडे (कोल्हापूर), समीर बोले (संगमेश्‍वर), प्रसाद दुर्गावळे (दापोली), अनिकेत पवार (कोल्हापूर) तर दुसर्‍या गटात संकेत पवार (कोल्हापूर), शिवांश अडूरकर (कोल्हापूर), रईस (बेळगाव), आरव शिंदे (कराड). स्पर्धेतील विजेत्यांना २१,००० रुपये, ११,००० रुपये, ८००१ रुपये आणि ५००१ रुपये रोख रक्कम, आकर्षक चषक आणि मानाचा फेटा देऊन गौरविण्यात आले. यावेळी सुप्रसिद्ध अभिनेता विनोदवीर अंशुमन विचारे, गायिका ईशानी पाटणकर यांनी उपस्थितांचे मनोरंजन केले.
---
चौकट
रिक्षा कसरतींचा थरार अनुभवला
कोल्हापूर येथील संतोष जाधव या रिक्षा चालकाने दाखवलेल्या कसरतींचा थरार रत्नागिरीकरांना चांगला भावला. यामध्ये मारुती मंदिर सर्कल येथे संतोष यांनी दोन चाकांवर रिक्षा चालवून दाखवली. रिक्षाचा वेग पाहून अनेकांच्या अंगावर काटा उभा राहिला. मारुती मंदिर पासून माळनाका इथपर्यंत रिव्हर्स गिअरमध्ये रिक्षा चालवण्याचे प्रात्यक्षिकही त्यांनी करुन दाखवले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com