संविधानाने बहाल केलेल्या अधिकारांबाबत सजग रहा

संविधानाने बहाल केलेल्या अधिकारांबाबत सजग रहा

पान ५ साठी)

संविधानाने बहाल केलेल्या अधिकारांबाबत सजग रहा
ॲड. राकेश भाटकर; अखिल भारतीय अधिवक्ता परिषद
रत्नागिरी, ता. २ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाने मूलभूत हक्क राखण्यासाठी रीट नावाचे हत्यार सर्वसामान्यांच्या हातात दिले आहे. प्रत्येकाने सामाजिक जाणीव ठेवून आपले वैयक्तिक आणि मूलभूत हक्क राखण्यासाठी या तरतुदींचा वापर करावा, असे आवाहन उच्च न्यायालयाचे अॅड. राकेश भाटकर यांनी केले.
अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या रत्नागिरी तालुका कार्यकारिणी आयोजित अभ्यास मंडळातर्फे ॲड. राकेश भाटकर, मुंबई उच्च न्यायालय यांनी रिट पिटीशन, त्यांचे प्रकार व जनहित याचिका या विषयावर सोप्या आणि सरळ भाषेत उपस्थित वकील आणि विद्यार्थी वर्गाला मार्गदर्शन केले.
अखिल भारतीय अधिवक्ता परिषद रत्नागिरी तालुका कार्यकारणी संस्थेच्या मार्फत अभ्यास मंडळ या संकल्पनेतील चौथे पुष्प गुंफण्यात आले. अभ्यास मंडळाच्या वतीने कार्यक्रमासाठी रिट आणि जनहित याचिका हा विषय आयोजित करण्यात आला होता. शनिवारी (ता. २९) एप्रिलला गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कार्यक्रमात झाला. संविधानाने सर्वसामान्य माणसाला दिलेले मूलभूत अधिकार आणि ते वापरण्यासाठी दिलेले याचिकेचे अधिकार यावरती सविस्तर आणि सोप्या पद्धतीने वकीलवर्ग आणि विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अॅड. भाटकर यांनी मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाने मूलभूत हक्क राखण्यासाठी रीट नावाचे हत्यार सर्वसामान्यांच्या हातात दिले आहे. प्रत्येकाने सामाजिक जाणीव ठेवून आपले वैयक्तिक आणि मूलभूत हक्क राखण्यासाठी या तरतुदींचा वापर करता येतो, असे त्यांनी आवर्जून सांगितले. सुत्रसंचालन अधिवक्ता मिरा मयुरेश देसाई मॅडम, वक्ता परिचय अधिवक्ता योगेश खाडिलकर, आभार प्रदर्शन अधिवक्ता पोतनीस मॅडम यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com