दोन दुचाकींच्या धडकेत 
इन्सुलीत तरुणाचा मृत्यू

दोन दुचाकींच्या धडकेत इन्सुलीत तरुणाचा मृत्यू

00108
इन्सुली ः अपघातानंतर झालेली गर्दी.
00109
इन्सुली ः अपघातग्रस्त दुचाकी. (छायाचित्रे ः नीलेश मोरजकर)


दोन दुचाकींच्या धडकेत
इन्सुलीत तरुणाचा मृत्यू

डोबाशेळत अपघात; मृत मूळ विजापूरचा

बांदा, ता. २ ः जुन्या मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली डोबाशेळ येथे आज दोन दुचाकींमध्ये समोरासमोर धडक झाली. त्यात बाबू थारु चव्हाण (वय ३८, रा. भटवाडी-सावंतवाडी, मूळ रा. विजापूर कर्नाटक) ठार झाले. ते बांधकाम कामगारांचे मुकादम होते. अपघात दुपारी बाराच्या सुमारास झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः संकेत रत्नाकर माळी (२४) व त्याचा मित्र कलश रमेश जाधव (दोघेही रा. सालईवाडा-सावंतवाडी) दुचाकी (एमएच ०७ एआर ००४२) घेऊन सावंतवाडी येथून बांदा येथे जात होते. बाबू चव्हाण दुचाकी (एमएच ०७ आर ८९८६) वरून सावंतवाडीच्या दिशेने जात होते. दोघे इन्सुली-डोबाशेळ येथील क्षेत्रफळ तिठा येथे आले असता समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला त्यांनी जोरदार धडक दिली. धडकेत दोन्ही दुचाकीस्वार रस्त्यावर आदळले. यात चव्हाण यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. समोरील दुचाकीस्वार माळी आणि जाधव गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. जखमी माळी व जाधव यांना उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील व डॉ. मयुरेश पटवर्धन यांनी जखमींवर उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी सावंतवाडी येथे पाठवले. यात जखमींच्या हाताला व डोक्याला दुखापत झाली होती. अपघातानंतर स्थानिकांनी सहकार्य केले. अपघाताची माहिती मिळताच बांदा सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक समीर भोसले, हेड कॉन्स्टेबल सिताकांत नाईक यांनी पंचनामा केला. वाहतूक शाखेचे महेंद्र बांदेकर हेही घटनास्थळी दाखल झाले. याबाबतची खबर दुचाकीस्वार संकेत माळी यांनी बांदा पोलिसांना दिली. अपघाताची नोंद बांदा पोलिसांत झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com