रिफायनरी समर्थनाच्या भूमिकेवरून मी मागे येतो

रिफायनरी समर्थनाच्या भूमिकेवरून मी मागे येतो

पान 1 साठी)

00049
राजन साळवी

रिफायनरीस समर्थनाच्या
भूमिकेवरून मागे ः साळवी
रत्नागिरी, ता. २ ः बारसूत येऊ घातलेल्या रिफायनरीला मी जाहीर समर्थन दर्शवले होते; परंतु आंदोलकांना दिलेली वागणूक माझ्या जिव्हारी लागली आहे. माझ्या रिफायनरी समर्थनाच्या भूमिकेवरून मी मागे येतो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो आदेश देतील तो मान्य असेल, असा यू टर्न घेत आमदार राजन साळवी यांनी रिफायनरीच्या समर्थनाच्या भूमिकेपासून फारकत घेतली.
बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राज्यात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. चार दिवसांपूर्वी माती परीक्षणादरम्यान आंदोलक काम रोखण्यासाठी धडकल्याने पोलिसांनी लाठीमार केला होता. अमानुषपणे मारहाण केल्याने त्याचे संतप्त पडसाद सर्वत्र उमटले. त्यानंतर प्रथमच आज साळवी यांनी आठवडा बाजार येथील संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत भूमिका जाहीर केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com