आमच्याशी संघर्ष करा मग ठाकरेंना अडवण्याची भाषा करा

आमच्याशी संघर्ष करा मग ठाकरेंना अडवण्याची भाषा करा

४९ ( पान ३ साठी )

आमच्याशी संघर्ष करा मग
ठाकरेंना अडवण्याची भाषा करा

आमदार साळवी ; पक्षनेतृत्वाला खूष करण्याची राणेंनी घेतली सुपारी

रत्नागिरी, ता. २ ः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ६ मे रोजी बारसू येथे येणार आहेत. त्यांना अडवण्याची भाषा नारायण राणे यांनी करू नये. आपल्या पक्ष नेतृत्वाला खूष करण्यासाठी राणे पिता-पुत्र बेताल वक्तव्य करत आहेत; पण टायगर अभी जिंदा है। आधी आमच्याशी संघर्ष करा आणि मग ठाकरेंना अडवण्याची भाषा करा, असे खुले आव्हान आमदार राजन साळवी यांनी दिले.
आठवडा बाजार संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ज्या वेळी जैतापूर प्रकल्पाविरोधात आंदोलन सुरू होते त्या वेळीदेखील माझ्या विरोधात नारायण राणे यांनी आरोप केले होते. मी त्यांना खुले आव्हान केले होते आणि आजही जाहीर आव्हान करतोय ‘टायगर अभी जिंदा है। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ६ मे रोजी राजापूरचा दौरा जाहीर केला आहे. ज्या राणेंना बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मानसन्मान मिळाला तेच राणे पिता-पुत्र उद्धव ठाकरे यांच्यावर बोलत आहेत. ठाकरेंवर बोलण्याची पात्रता नाही. आधी शिवसेनेत नंतर काँग्रेसमध्ये त्यानंतर स्वतःचा पक्ष सर्व फिरून झाल्यानंतर भाजपमध्ये राणे दाखल झाले. आपल्या पक्षनेतृत्वाला खूष करण्यासाठी राणेंनी पक्षाकडूनच सुपारी घेतली आहे, अशी सडकून टीका आमदार साळवी यांनी केली. राणेंना आव्हान देतो की, ठाकरेंना भिडण्यापूर्वी तुम्हाला आमच्याशी संघर्ष करावा लागेल. त्यामुळे राणेंनी ठाकरेंना अडवण्याची भाषा करू नये, असा सल्लादेखील साळवी यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com