खेड-मोटारीची दुचाकीसह पादचाऱ्यांना धडक

खेड-मोटारीची दुचाकीसह पादचाऱ्यांना धडक

मोटारीची दुचाकीसह पादचाऱ्यांना धडक; ६ जखमी
खेड, ता. २ : मुंबई- गोवा महामार्गावरील भरणे-शिंदेवाडीनजीक मंगळवारी (ता. २) सकाळी पावणेनऊच्या सुमारास मोटारचालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटारीने एका दुचाकीसह रस्त्यावर उभ्या असलेल्या ग्रामस्थांना धडक दिली. यामध्ये सहाजण जखमी झाले आहेत. विशाल राजाराम निवाते (वय १४), वैष्णवी राजाराम निवाते (१८), राजाराम शांताराम निवाते (४५, सर्व रा. सुसेरी), शरद राघू देवकर (६२, रा. वाकवली),
तेजस मोहन दळवी (२२, खवटी), अजित दळवी (३५, खवटी) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. मोटार मुंबईकडून खेडच्या दिशेने येत होती. मोटारीवरील (एमएच-४७-एवाय-८६४२) चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरणे-शिंदेवाडी स्टॉपवर उभे असणारे प्रवासी व दुचाकीला
(एमएच-०८-एल-६९४७) पाठीमागून धडक दिली. भरणे नाका ब्रिजखाली उभी असणारी श्री जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्था नाणीजधामचे रुग्णवाहिका चालक सूरज हंबीर यांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com