चिपळूण-शरद पवार निवृत्ती मागे घेतील

चिपळूण-शरद पवार निवृत्ती मागे घेतील

५५ (पान ३ साठी)

शरद पवार निवृत्ती मागे घेतील

आमदार निकम ; राष्ट्रवादी उद्योग व्यापार सेल जिल्हाध्यक्ष अडरेकरांचा राजीनामा

चिपळूण, ता. २ ः राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी निवृत्त होणार असल्याची घोषणा करताच कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. त्यासाठी प्रत्येक विभागातील राष्ट्रवादीचे आमदार मुंबईत दाखल झाले असून त्यांची मनधरणी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून ते निवृत्ती मागे घेतील, अशी भावना आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या चिपळूणात त्याचे पडसाद उमटले. येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नैराश्याची लाट पसरली आहे. त्यातूनच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उद्योग व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष मुराद अडरेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. खासदार शरद पवार यांनी आकस्मितपणे निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्यांनी आपला राजीनामा उद्योग व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. आता आपली काम करण्याची इच्छा नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. एवढेच नव्हे तर आपण जिल्ह्यात नियुक्ती केलेली समिती देखील बरखास्त करीत असल्याचेही त्यांनी आपल्या राजीनाम्यात नमूद केले आहे. दरम्यान राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची बैठक शहरातील पागझरी येथील कन्या शाळेत आयोजित केली होती. या बैठकीत पेढांबे येथे राष्ट्रवादी चषक बैलगाडी स्पर्धा घेण्याबाबतचे नियोजन करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com