वनक्षेत्रपाल शिंदेंचा कोल्हापुरात सन्मान

वनक्षेत्रपाल शिंदेंचा कोल्हापुरात सन्मान

00124
साटेली भेडशी ः जय भोसले यांचा सन्मान करताना मान्यवर. (छायाचित्र ः संदेश देसाई)

साटेली-भेडशीत जय भोसलेंचा सत्कार
दोडामार्ग : जिल्हा क्रिकेट कॉमेंट्रेटर असोसिएशनच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल साटेली-भेडशी गावचे सुपुत्र जय भोसले यांचा नुकताच दामोदर कला क्रीडा मंडळ आणि भेडशी ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. राज्यातील पहिली क्रिकेट समालोचक संघटना जिल्ह्यात स्थापन करण्यात आली. या संघटनेच्या सचिवपदी भोसले यांची निवड झाली. भोसले हे उत्कृष्ट समालोचक म्हणून परिचित असून त्यांनी आशिया खंडातील सर्वात मोठ्या रकमेच्या उडुपी प्रीमियर लीग तसेच गोव्यातील साऊथ गोवा क्रिकेट स्पर्धेत समालोचन केले आहे. या निवडीबद्दल त्यांचा साटेली भेडशी येथील दामोदर कला, क्रीडा मंडळाच्यावतीने उद्योजक नंदू टोपले यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी उपसरपंच गणपत डांगी, ग्रामपंचायत सदस्य संतोष भिसे, उद्योजक गोपाळ बुडके, उमाकांत टोपले, सर्वेश मणेरकर, युवा उद्योजक सिद्धेश पांगम, सागर मोरजकर, समीर मोरजकर, नीलेश तळणकर, मधुकर जुवेकर, गोविंद शिरसाट, सुजय मणेरकर आदी उपस्थित होते.
...............
00125
कोल्हापूर ः कुडाळ वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांना गौरविताना मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजम.

वनक्षेत्रपाल शिंदेंचा कोल्हापुरात सन्मान
कुडाळ ः वन संरक्षण आणि वन्यजीव व्यवस्थापनात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कुडाळचे वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांना महाराष्ट्र दिनी मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजम यांच्या हस्ते कोल्हापूर येथे गौरविण्यात आले. वनक्षेत्रपाल शिंदे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी विनापरवाना लाकूड वाहतुकीवर कारवाई केली असून जखमी अवस्थेत मिळालेल्या बिबट्या, खवले मांजरांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त केले आहे. विहिरीत पडलेल्या वन्यप्राण्यांची बचाव पथकाच्या साहय्याने सुखरूप सुटका केली आहे. सामाजिक वनीकरणात सक्रिय सहभाग घेत निसर्गाचे संवर्धन, संरक्षणासाठी कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी कोल्हापूरचे उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद, विभागीय वनाधिकारी सागर गवते आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात देवसू वनपाल सदानंद परब, सावंतवाडी लेखापाल मृणाल कुलकर्णी, मठ वनरक्षक सूर्यकांत सावंत, आंबोली वनमजूर ज्ञानेश्वर गावडे यांनाही गौरविण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com