आमदार साळवींना जशास तसे उत्तर दिले जाईल
४१ (पान ३ साठी)
आमदार साळवींना जशास तसे उत्तर दिले जाईल
भाजप जिल्हा उपाध्यक्ष नागरेकर ः मतांसाठी मारली पलटी
राजापूर, ता. ३ : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे आणि त्यांच्या सुपुत्रांचे नाव घेण्याची व त्यांच्या समोर उभे राहून नजरेला नजर देण्याची ज्यांची हिंमत नाही, त्या आमदार राजन साळवी यांनी नारायण राणे आणि त्यांच्या सुपुत्रांना आव्हान देण्याची भाषा करू नये. त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर यांनी दिला. रिफायनरी प्रकल्प बारसू येथे करावा हे पत्र जेव्हा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना दिले, तेव्हा आमदार साळवी काय करत होते. तेव्हा त्यांना का नाही अडवलेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनावरून आमदार साळवी यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना नागरेकर म्हणाले, आमदार साळवी हे राजापूरकरांचे कधीही नव्हते. याचा प्रत्यय जनतेला आला आहे. अणुऊर्जा, नाणार, आयलॉग जेटी या प्रकल्पांना विरोध करणारे हेच होते. बेरोजगारीच्या मुद्द्यावर त्यांनी यापूर्वी बारसू रिफायनरी प्रकल्पाला दिलेले समर्थन किती तकलादू होते, हे आता समजून आले आहे. बेरोजगारांच्या भविष्यापेक्षा आगामी निवडणुकीतील स्वतःच्या मतांसाठी साळवी यांनी मारलेली पलटी पाहता हे पार्सल भविष्यात आम्ही रत्नागिरीत परत पाठवू. राजापूर मतदारसंघातील बेरोजगारीचा प्रश्न, स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीतही मतदारसंघात नसलेल्या पायाभूत सुविधा याबाबत कळवळा दाखवला. मात्र ही नौटंकी राजापूरकर जनता ओळखून आहे. ते फक्त २०२४ ची वाट पाहत आहे. जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना साळवी आणि खासदार विनायक राऊत यांच्या गळयात भविष्यात शिवसैनिकच कशा माळा घालतील ते त्यांना कळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.