टाकीत पडलेल्या बैलाला जीवदान

टाकीत पडलेल्या बैलाला जीवदान

१७०५

टाकीत पडलेल्या बैलाला जीवदान
आचरा : चिंदर-सडेवाडी येथील सिमेंट लादी व्यावसायिकाने बांधलेल्या टाकीमध्ये पडलेल्या बैलाला प्राणिमित्रांनी जीवदान दिले. चिंदर-सडेवाडी येथील सिमेंट लादी व्यावसायिकाने बांधलेल्या टाकीमध्ये काल (ता. ८) दुपारी बैल पडला. काहीतरी आवाज येत असल्याचे लक्षात आल्यावर शेजारील विशाल गोलतकर यांनी धाव घेत त्याला काठी व दोरीचा आधार दिला. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून त्यांनी प्राणीमित्र, शेजारील व्यक्तींना बोलावले. यावेळी प्राणीमित्र स्वप्नील गोसावी, समीर कांबळी, दीपक गोसावी, किरण सावंत आदींनी अथक प्रयत्नांनी बैलाला बाहेर काढण्यात यश आले.
---

पाककला स्पर्धेमध्ये प्रमिला शिरोडकर प्रथम
ओरोस ः नांदोस (ता. मालवण) येथे माता यशोदा परिवाराच्यावतीने घेण्यात आलेल्या महिलांच्या पाककला स्पर्धेत प्रमिला शिरोडकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. आरोग्य व स्वच्छतेचा प्रसार करणाऱ्या माता यशोदा परिवारातर्फे ग्रामीण भागातील महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी श्रीकृष्ण हरचांदे यांच्या पुढाकाराने नांदोस येथे पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत द्वितीय वैशाली मारगी, तृतीय क्रमांक हेमांगी काळसेकर यांनी मिळविला. उत्तेजनार्थ गौरी पार्टे, नमिता नांदोसकर, पूजा थवी, मीनल पार्टे, पूजा नलावडे यांनी मिळविला. अरुणा हरचांदे यांच्या उपस्थितीत डॉ. ज्योती राजपूरकर यांच्या हस्ते विजेत्यांना रोख रक्कम, शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सुजाता पावसकर, प्रियांका भोगटे यांनी परीक्षण केले. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी माता यशोदा परिवारातर्फे घेतलेली पाककला स्पर्धा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे यावेळी प्रियांका भोगटे यांनी सांगितले. यावेळी प्रिया कांबळी, भक्ती हरचांदे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com