आप्तेष्ट, मित्रमंडळींना दिली पुस्तकांची भेट
२० (टुडे पान ३ साठी, अॅंकर)
-rat१९p१७.jpg ः
२३M०३७३३
राजापूर ः विवाहसोहळ्या निमित्ताने पुस्तक वाटप केलेल्या बच्चेकंपनीसमवेत नवदाम्पत्य.
--------------
आप्तेष्ट, मित्रमंडळींना दिली पुस्तकांची भेट
चौकेकर नवदाम्पत्य ; लग्नपत्रिकेतूनही सामाजिक संदेश
राजापूर, ता. १९ ः लग्नबंधनातून आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचे अभिवचन देणाऱ्या तालुक्यातील हसोळतर्फ सौंदळ येथील किशोरी आणि दीपक चौकेकर या नवदाम्पत्याने लग्नपत्रिकेच्या माध्यमातून साऱ्यांना सामाजिक जाणिवेचे विविधांगी संदेश देत सामाजिक प्रबोधन केले. त्याचवेळी लग्नसोहळ्याला उपस्थित असलेली मित्रमंडळी, नातेवाईक, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि बच्चेकंपनी यांना पुस्तकांचे अनोखे रिटर्न गिफ्ट देऊन समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
तालुक्यातील हसोळे येथील दीपक चौकेकर आणि सोल्ये येथील किशोरी सौंदळकर यांचा नुकताच विवाह पार पडला. या सोहळ्यासाठी मित्रमंडळी आणि आप्तेष्टांना वाटण्यात आलेल्या लग्नपत्रिकेवर विविधांगी सामाजिक संदेश देण्यात आले होते. त्यामध्ये लोकशाहीतील महत्वाचा भाग असलेल्या मतदानाचे महत्व, नेत्रदान, पाणीबचत, शिक्षणाचा अधिकार, स्वच्छता अभियान, वृक्षारोपणाचे महत्व, रक्तदान म्हणजे जीवनदान याबाबतचे संदेशही त्यांनी पत्रिकेच्या माध्यमातून साऱ्यांना दिला आहे.
विवाह पार पडल्यानंतर या दाम्पत्याने बच्चेकंपनीला गोष्टी, गाणी, चित्रकला, शेती, विज्ञान, गणित अशा विविध विषयांची पुस्तके भेट म्हणून दिली. त्याचवेळी तरुण मंडळी, ज्येष्ठ, सुशिक्षित, वाचनाची आवड असणाऱ्या सर्व नागरिक व आप्तेष्टांना ‘छत्रपती शिवाजी महाराज जीवनरहस्य’ हे नरहर कुरूंदकर यांचे पुस्तक व श्रीफळ भेट देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.