नानिवडेकरांच्या आठवणींना मिळाला उजाळा

नानिवडेकरांच्या आठवणींना मिळाला उजाळा

swt1910.jpg
03828
तळेरेः येथील प्रज्ञांगण परिवाराने आयोजित केलेल्या ‘गझल नानिवडेकरांची’ या कार्यक्रमात गझल सादर करताना प्रमोद कोयंडे. बाजूला सतिश मदभावे, ए. एच. मुल्ला, संजय खानविलकर, निकेत पावसकर.

नानिवडेकरांच्या आठवणींना मिळाला उजाळा
तळेरेत आयोजनः प्रज्ञांगण परिवाराचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १८ः गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांची जयंतीनिमित्त तळेरे येथे ‘गझल नानिवडेकरांची’ हा कार्यक्रम गुरुवारी प्रज्ञांगण परिवाराने आयोजित केला होता. या कार्यक्रमात प्रसिध्द गझलकार, उत्तम माणूस, मार्गदर्शक, पत्रकार आणि चांगला मित्र असे नानिवडेकर यांचे विविध पैलू मांडताना त्यांच्या अनेक गझलांचे सादरीकरण करण्यात आले. यानिमित्त नानिवडेकर यांच्या विविध आठवणींना उजाळा मिळाला.
प्रास्ताविक सतिश मदभावे यांनी केले. ते म्हणाले की, पुढच्या पिढीला गझलकार मधुसूदन नानिवडेकर समजावेत. तळेरेसारख्या गावात एवढे मोठे गझलकार राहत होते. आणि त्यांचेही या गावावर अतोनात प्रेम होते. संपूर्ण महाराष्ट्राला माहित असलेल्या या साहित्य सुपुत्राचे साहित्य या पिढीला माहित व्हावे, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यानंतर निकेत पावसकर यांनी नानिवडेकर यांची ओळख करुन देतानाच लेखक, अभिनेते प्रमोद कोयंडे यांनी नानिवडेकर यांच्या विविध गझला सादर केल्या. चांदणे नदिपात्रात, भलभलते, ठरावाप्रमाणे, हल्ली तू, तुझी याद येते अवेळी अवेळी आणि हरकत नाही अशा विविध गझलांनी नानिवडेकर यांच्या आठवणी जागवल्या गेल्या. या कार्यक्रमाचे आयोजन श्रावणी कंप्यूटर आणि मेधांश कंप्यूटर यांच्या सहकार्याने प्रज्ञांगण परिवाराने केले होते. यावेळी लेखक, अभिनेते प्रमोद कोयंडे, गवाणे विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक ए. एच. मुल्ला, पत्रकार संजय खानविलकर, संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर, श्रावणी मदभावे, विश्रांती कोयंडे, चित्रकार मृण्मयी पांचाळ, स्मितेश पाष्टे उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रणाली मांजरेकर तर आभार श्रावणी मदभावे यांनी मानले. या कार्यक्रमाचा शेवट नानिवडेकर यांची प्रसिद्ध गझल ''हरकत नाही'' या गझलेने झाला. ही गझल प्रमोद कोयंडे यांनी सादर केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com