Ratnagiri Kolhapur Road
Ratnagiri Kolhapur Roadsakal

Ratnagiri Kolhapur Highway : रत्नागिरी-कोल्हापूर वाहतूक होणार जलद; चौपदरीकरणाचे काम होणार लवकरच सुरू

रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे. यासाठीचे आवश्यक ते सर्व भूसंपादन पूर्ण झाले आहे.

रत्नागिरी - रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे. यासाठीचे आवश्यक ते सर्व भूसंपादन पूर्ण झाले आहे. ठेकेदाराची नियुक्तीही झाली आहे. यामुळे कोल्हापुरातून औद्योगिक उत्पादने, साखरेसह अन्य वस्तूंच्या निर्यातीसाठी मदत होणार आहे. तसेच वाहतूक जलद होऊन त्याचा नागरिक, उद्योजक व शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. सुमारे पाऊण तास एवढ्या वेळेची बचत होणार आहे.

रत्नागिरी कोल्हापूर नागपूर या महामार्गापैकी चौपदरीकरणासाठी दोन हजार ११४ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. १३४ कि. मी. रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी ६६७.१३ हेक्टर जमीन संपादित केली आहे. पूर्वी कोल्हापूर शहरातून जाणारा हा महामार्ग आता केर्लीमार्गे (बायपास) वळविण्यात आला आहे. केर्ली- शिये चोकाकमार्गे रत्नागिरी-नागपूर या महामार्गास जोडला जाणार आहे.

रत्नागिरी ते आंबा या अंतरातील भूसंपादन पूर्ण झाले आहे. उर्वरित आंबा ते पैजारवाडी या ४५ किमी मार्गासाठी १७० हेक्टरचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. पैजारवाडी ते चोकाक या ३४ किमीसाठी १६२.६७ हेक्टरचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. या कामासाठी ठेकेदाराची निविदा मंजूर झाली असून त्याची वित्तीय परिस्थिती आणि बँक व्यवहार तपासणीचे कामही पूर्ण झाले आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याने वर्कऑर्डर दिल्लीला अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहे. मंजुरीनंतर एक-दोन दिवसांत वर्कऑर्डर दिली जाणार आहे. त्यानंतर कामाला सुरवात होईल.

Ratnagiri Kolhapur Road
Accident News : भरधाव दुचाकी कठड्यावर आदळून सख्खे भाऊ ठार

४९ गावात भूसंपादन

रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गाच्या चौपदरीकरणातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असलेले भूसंपादन पूर्ण झाले असून ४९ गावांतील सुमारे १२ हजार ६०८ खातेदारांची २४ लाख १० हजार २६० चौ. मी. जमीन संपादित केली आहे.

भूसंपादनाच्या ४९ गावांपैकी सर्वाधिक म्हणजे २५ गावे शाहूवाडी तालुक्यातील आहेत. पन्हाळा १०, करवीर ८ आणि हातकणंगले तालुक्यातील सहा गावांतील भूसंपादन केले आहे. या सर्व भूसंपादनासाठी महसूल विभागाने एक हजार २९० कोटी ३८ लाख रुपयांचा निधी वितरित केल्याचे महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com