गोवेरीत विविध स्पर्धांना प्रतिसाद

गोवेरीत विविध स्पर्धांना प्रतिसाद

swt२५४.jpg
०४९२०
गोवेरीः विविध स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

गोवेरीत विविध स्पर्धांना प्रतिसाद
विजेत्यांचा गौरवः ज्ञानदीप वाचनालयाचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २५ः ज्ञानदीप वाचनालय व ग्रंथसंग्रहालय आणि श्री देव सत्पुरुष कला, क्रीडा मंडळ गोवेरी यांच्यावतीने वाचनालयाच्या वर्धापन दिनानिमित्त गोवेरी सत्पुरुष मंदिरात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच दशरथ परब यांच्या हस्ते झाले. यावेळी उपसरपंच स्वरा गावडे, ग्रामपंचायत सदस्या आनंदी गावडे, वाचनालयाचे अध्यक्ष सतीश गावडे, मंडळाचे अध्यक्ष प्रकाश गावडे, उमेश गावडे, महेश गावडे, मोहन जाधव, नंदकिशोर गावडे, सत्यवान अरमरकर आदी उपस्थित होते. वाचनालय कार्यालयात श्रींच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले.
क्रीडा स्पर्धांचा निकाल अनुक्रमे असाः ५० मीटर धावणे-मुलगे (लहान गट)-गौरव गावडे, चंद्रकांत जाधव, चैतन्य राऊळ, मुली (लहान गट)-पूर्वा गावडे, जान्हवी वारंग, साक्षी जाधव. १०० मीटर धावणे ः मुलगे (मोठा गट)-पांडुरंग गावडे, साहिल गोलम, सार्थक गावडे, मुली (मोठा गट)-नागश्री गावडे, वेदिका गावडे, तन्वी गावडे. वैयक्तिक गावमर्यादित रेकॉर्ड डान्स-सान्वी परब, पूर्वा गावडे, वेदिका गावडे, उत्तेजनार्थ हर्षद गोलम. जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स-आरव आहिर, समर्थ गवंडी, दुर्वा पावसकर, उत्तेजनार्थ दृष्यम परब. प्रश्नमंजुषा-अथर्व गावडे व मयुरेश गावडे, हिमानी वाळवे व नागश्री गावडे, मानसी गावडे व मृण्मयी गावडे. संगीत खुर्ची-तन्वी गावडे, मानसी गावडे, जान्हवी वारंग. वन मिनिट शो- लावण्या जाधव, विस्मया मर्गज, काव्या वारंग. नेमबाजी-सार्थक सावंत, अश्विनी जाधव, रोहित मोरे. बुद्धिबळ-आदित्य गावडे, गौतम जाधव. रस्सीखेच स्पर्धा-छत्रपती स्पोर्ट (विजेता), दिनेश स्पोर्ट (उपविजेता). स्पर्धेचे बक्षीस वितरण सत्पुरुष मंदिरात झाले. यावेळी सरपंच दशरथ परब, उपसरपंच स्वरा गावडे, पदवीधर शिक्षक प्रसाद वारंग, राजाराम कविटकर, सेवानिवृत्त शिक्षक प्रवीण वेटे आदी उपस्थित होते. यानिमित्त वेतोरे हायस्कूलची आठवीतील शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थिनी साक्षी गावडे हिचा सत्कार करण्यात आला. वाचनालयाकडून दिला जाणारा आदर्श विदयार्थी पुरस्कार नलिनी जाधव (शाळा नेरुर गोवेरी) व नीरज गावडे (शाळा नेरुर गोवेरी भगतवाडी) यांना, ग्रंथालयाकडून दिला जाणारा आदर्श वाचक पुरस्कार मैथिली गावडे हिला देऊन गौरविण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com