
साडवली ः संस्कृती ब्रीदला मदतीचा ओघ सुरू
संस्कृती ब्रीदला मदतीचा ओघ सुरू
साडवली, ता. २७ः देवरूख महाविद्यालयाची दृष्टिहीन विद्यार्थी संस्कृती ब्रीद हिने बारावी परीक्षेत द्वितीय क्रमांक पटकावला. तिच्या कौतुकाची बातमी ''सकाळ'' मध्ये प्रसिद्ध होताच अनेकांनी तिचे कौतुक केले व तिची शिकण्याची जिद्द पाहून अनेक दानशुरांनी मदतीचे हात पुढे केले आहेत. आर्थिक मदत तसेच शैक्षणिक साहित्य तिला उपलब्ध करून दिले आहे. अनेकांनी फोन करून मदतीसाठी आम्ही तयार आहोत, असे सांगितले. संस्कृतीला बीए बीएड करून शिक्षक व्हायचे आहे. स्पेशल एज्युकेशनसाठी तिचे प्रयत्न सुरू आहेत. गायनकलेसह हार्मोनियम वादनात ती पारंगत आहे. तिला संगीत विशारद व्हायचे आहे. यासाठीही तिला मदत देण्याचे अनेकांनी जाहीर केले आहे. तिची संगणक शिकण्याची इच्छाही पूर्ण होणार आहे. मोफत संगणक शिकवणारा दाता मिळाला आहे. ''सकाळ'' व दानशुरांच्या मदतीबद्दल संस्कृतीने जाहीर आभार मानले आहेत. मला अधिक शिकण्याची संधी व प्रेरणा मिळाल्याचे संस्कृतीने सांगितले.