साडवली-पित्रे महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साडवली-पित्रे महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन
साडवली-पित्रे महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

साडवली-पित्रे महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

sakal_logo
By

rat28p29.jpg-
05577
देवरूखः स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना प्रा. दळवी, श्री. कुलकर्णी, श्री. पवार आणि प्रा. सौ. सीमा शेट्ये.
-------------
पित्रे महाविद्यालयात
सावरकर यांना अभिवादन
साडवली, ता. २९: देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन करण्यात.
प्रा. धनंजय दळवी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रा. सीमा शेट्ये यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा आढावा घेताना त्यांचे साहित्यिक म्हणून असणारे योगदान, आत्मचरित्रकार म्हणून त्यांच्या लेखन शैलीचा वेगळेपणा, मराठी भाषाशुद्धी व लिपी शुद्धीसाठी केलेले महत्त्वपूर्ण कार्य, गाजलेली गीते व इतर साहित्य याबाबत समग्र आढावा घेतला. यानंतर ''ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला'' हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे देशभक्तीपर गीत प्रथम शिंदे, साक्षी गवंडी, अमित कुलकर्णी, प्रा. सीमा शेट्ये यांनी सादर करून उपस्थितांची वाहव्वा मिळवली. प्रा. धनंजय दळवी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यसेनानी, समाज सुधारक, राजकारणी, तत्त्वज्ञ, मराठी लेखक व कवी म्हणून केलेल्या उपयुक्त कार्याचा सखोल आढावा घेतला.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना, ग्रंथालय व प्रसिद्धी विभाग यांनी संयुक्तपणे केले होते. विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विविधांगी व्यक्तिमत्त्वाची माहिती व्हावी, यासाठी विविध वर्गांच्या व्हाट्सअप ग्रुपकरीता सावरकरांनी लिहिलेली पीडीएफ स्वरूपातील पुस्तके, शॉर्ट फिल्म, हिंदी पिक्चर, व्याख्यान ग्रंथालय विभागाच्यावतीने ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे यांनी उपलब्ध करून दिले. संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे यांनी आयोजकांचे कौतुक केले.